*आजपासून पंढरपूर-म्हैसूर नवीन रेल्वे सुरू*
*पंढरपूरहून दक्षिण भारतात जाणारी रेल्वेगाडी धावल्याने प्रवाशात आनंद*
*सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन व धन्यवाद*
अरुण कोरे, प्रतिनिधी कुर्डुवाडी.
कुर्डुवाडी:-पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पंढरपूरहून दक्षिण भारतात नव्याने सुरू करण्यास परवानगी दिलेली गाडी आज मंगळवार पासून पंढरपूर ते म्हैसूर दिमाखात सुरू झाल्याने प्रवाशात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
म्हैसूर ते सोलापूर पर्यंत ही गाडी ब-याच वर्षांपासून होती.ती गाडी सोलापूर येथे चार पाच तास पडूनच असे.ही गाडी तेथे थांबवण्यापेक्षा पुढे पंढरपूर सांगोला मिरजपर्यत नेण्यात यावी अशी प्रवाशांकडून अनेक दिवसांपासूनची रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती.सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीनेही त्याचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी व दक्षिण भारतास पंढरपूरच्या तिर्थक्षेत्रास जोडण्यासाठी ही गाडी पंढरपूरला सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी एका पत्रकाद्वारे परवानगी दिली होती.
ही गाडी आदल्या दिवशी म्हैसूर येथून पावणे चारला निघून दुस-या दिवशी कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरला बारा वाजून पंचवीस मिनिटाला पोहचते.
व पंढरपूरहून दररोज दुपारी बारा पच्चावन्नला निघून दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे अकरास म्हैसूरला पोहचते.पंढरपूरला नव्याने आज सुरू करण्यात आलेल्या गाडीला पुष्पहारांनी सजविण्यात आले होते.प
पंढरपूरहून दुपारी कुर्डुवाडी, सोलापूरला रेल्वेगाडी नव्हती ती यानिमित्ताने सुरू झाली असून दक्षिण भारतात कलबुर्गी पर्यंत एक गाडी गतवर्षी सुरू झाली आहे आता म्हैसूर पर्यंत थेट गाडी सुरू झाल्याने सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष हर्षद मोरे व कार्याध्यक्ष अरुण कोरे(पत्रकार) यांनी रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन रेल्वे प्रशासनास प्रवाशांच्या वतीने धन्यवाद देऊन आभार मानले आहेत.
तसेच पंढरपूरहून उत्तर भारतात थेट गाडी सुरू करण्याची अनेक वर्षांपासून मागणी असून त्यांचीही युद्ध पातळीवर दखल घेऊन तिही लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा