Breaking

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

दहीहंडी आपली पारंपरिक संस्कृती- राहुल नार्वेकरबोराबाजार मध्ये मराठी पत्रकार परिषदेचा दहीहंडी उस्तव साजरी



दहीहंडी आपली पारंपरिक संस्कृती- राहुल नार्वेकर
बोराबाजार मध्ये मराठी पत्रकार परिषदेचा दहीहंडी उस्तव साजरी


मुंबई प्रतिनिधी

मुंबई हि मराठी परंपरेची जागतिक उत्सव नगरी असून दहिकाला दहीहंडी हि आपली पारंपरिक संस्कृती असून ती संस्कृती आपण टिकून ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दहीहंडी उत्सवात केले.

महाराष्ट्र समाजसेवक संघ, व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांचा संयुक्त विद्यमाने कुलाबा येथील बोराबझार येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदचे मुंबई उपाध्यक्ष विनायक सानप यांचा नेतृत्वाखाली दहीहंडी उस्तव साजरा करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, मुंबई विभागीय सचिव दिपक कैतके, मुंबई सरचिटणीस दीपक पवार,तसेच माजी नगरसेवक गणेश सानप,सुजाता सानप आदी मान्यवर यावेळी उपस्थिती होती.
 उस्तव साजरा करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  म्हणाले की, दहीहंडी आपला मोठा उस्तव असून या सणात सर्व जातीधर्माचे लोक एकजुटीने हा उत्सव साजरा करतात. या सणा निमित्त आपण सर्व एकोप्याने आनंदाने एक होतो. हीच सांस्कृतिक परंपरा आपण सर्वांनी टिकून ठेऊया. असं म्हणत नार्वेकर यांनी दहीहंडी कला पथक गोविंदावीर आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ३० दहीहंडी गोविंदावीर पथकानीं दहीहंडीला सलामी दिली. पथकाना मानधन आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र समाजसेवक अध्यक्ष राजेंद्र जाधव, रवी गुप्ता, राहुल माकवाना, नागेश हिवराळे, दृवराज मोरे, संजय सिंग, गणेश आव्हाड,
विजय कोटीयन, राजू खैरे, लखन खतटवाल,प्रदीप मार्डेकर  या कार्येकर्ते यांनी संपूर्ण उस्तव साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा