*राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामांना 10 कोटी 15 लाख निधी मंजूर - आ.बबनराव शिंदे*
बेंबळे/ प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघात हा माढा,पंढरपूर व माळशिरस या तीन तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी 10 कोटी 15 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, माढा विधानसभा मतदारसंघातील माढा पंढरपूर व माळशिरस तीन तालुक्यातील 37 गावांसाठी राज्य शासनाच्या विविध योजनेंअंतर्गत 10 कोटी 15 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामामध्ये वाड्यावस्त्यांवरील रस्ते, अंतर्गत सिमेंट रस्ते व इतर कामांचा समावेश असून या कामांना निधी मंजूर करणेत यावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे भेटून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुढील प्रमाणे कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
माढा तालुका-
1)अंजनगांव उ- अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,2)अरण-कुरणवस्ती ते एन.एच.65 रस्ता करणे-30 लाख
3)उपळाई खु- अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,4)कापसेवाडी- अंतर्गत सिमेंट रस्ते-30 लाख,5)केवड- केवड-दारफळ शिव रस्ता-30 लाख,6)चिंचोली- अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,7)जाधववाडी(मा)-गोसावी वस्ती ते चवरे वस्ती रस्ता-25 लाख,8)तांबवे(टे) - अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,9)निमगांव(टे)- अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,10)परिते -अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,11)पालवण-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,12)बावी -अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,13)बुद्रुकवाडी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,14)मानेगांव-जुना माढा रस्ता करणे-15 लाख,15)मानेगांव-खैराव शिव रस्ता करणे-15 लाख, 16)रणदिवेवाडी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,17)रांझणी-भिमानगर-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख
18)लऊळ-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,19)लोंढेवाडी-अंतर्गत सिमेंट रस्ता-30 लाख, 20)वडाचीवाडी (अ.उ) -अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,21)वरवडे-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,22)विठ्ठलवाडी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,23)वेताळवाडी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,24)सापटणे टे-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,25)शेवरे-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,
पंढरपूर तालुका-
1)करकंब-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,2)कान्हापूरी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,3)खरातवाडी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,4)चिंचणी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख, 5)देगाव-शेगाव दुमाला रस्ता करणे-30 लाख,6)देवडे-देवडे भोसे रस्ता करणे-30 लाख,7)नेमतवाडी-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,8)पिराचीकुरोली-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,9)रोपळे(बु)-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,10)शेगाव दुमाला-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख,
माळशिरस तालुका
1)उंबरे (वेळापूर)-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-25 लाख,2)जांभुड-अंतर्गत व वाडीवस्ती रस्ते-30 लाख
या गावअंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यास गावातील रस्ते नागरिकांना वाहतूकीच्या दृष्टीने सुलभ होणार आहे. याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. या रस्त्यांचे कामाबाबत लवकरच पुढील कार्यवाही होणार आहे. या रस्त्यांचे कामास मंजूरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा