Breaking

बुधवार, २९ मार्च, २०२३

वडोली येथे महिलांचा सन्मान सोहळा, साडी वाटप व खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न



वडोली येथे महिलांचा सन्मान सोहळा, साडी वाटप व खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न



टेंभुर्णी (प्रतिनिधी) : - माढा तालुक्यातील वडोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात चांगले कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा,ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार वाटप व माढा तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी तुकाराम ढवळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्या अंजनादेवी शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती संजय पाटील-भिमानगरकर, उपसभापती धनाजी जवळगे, चित्राताई वाघ, सारिका रमेश पाटील, स्वातीताई बाळासाहेब पाटील, जयश्री भीमराव भरगंडे, प्रा.उषा संतोष पाटील, स्वाती प्रशांत गांधी, तनुजा शहा, रेणुका भणगे,अश्विनी बाळासाहेब ढेकणे, दिपाली रुपनवर हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

रणजितसिंह शिंदे यांनी चांगले कार्य करणाऱ्या माता भगिनींचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सतिश काळे व सचिव धनश्री काळे यांनी राबविला असून ग्रामीण भागातील हा दुर्मिळ कार्यक्रम असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सतिश काळे यांनी केली. यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.


तर सतिश नवनाथ काळे,आधार फाउंडेशन च्या सचिव धनश्री सतिश काळे, विद्या भाग्यवंत, हनुमंत भाग्यवंत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी चार महिलांना सिंधुताई सपकाळ गौरव पुरस्कार,पाच महिलांना इंदिरा गांधी गौरव पुरस्कार,सहा महिलांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार, दोन आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, दोन कन्यारत्न पुरस्कार, चाळीस महिलांना व्यवसाय सेवा पुरस्कार, बावन्न महिलांना उत्कृष्ट शेती पुरस्कार, तीस महिलांना उत्कृष्ठ गृहिणी पुरस्कार, चौदा बचत गटाला पुरस्कार व पंचावन्न विधवा महिलांना साडी वाटप अहिल्याबाई होळकर गौरव पुरस्कार देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
न्यू होम मिनीस्टर म्हणून नितीन पाटील यांनी उत्कृष्ठ काम करून सर्व उपस्थित महिलांची मने जिंकली.
सुत्रसंचालन राजू पाटील व मनीषा माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्रपाली मोरे, पुष्पा काळे, वैशाली भाग्यवंत, छाया हावळे यांनी परिश्रम घेतले.

चौकट १
 न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा यामध्ये सुनिता मोरे यांना प्रथम मानाची पैठणी, दूतिय उज्वला भाग्यवंत यांना पैठणी, तृतीय रुक्मिणी कांबळे यांना सोन्याची नथ, आशा बागाव, निकिता मोरे, कीर्ती चव्हाण, रेखा मोरे, पुनम वीरकर, सोनाली मोरे, नेहा पडवळकर यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे जिंकली. तर मुलींमध्ये प्रियांका बागाव प्रथम, साक्षी बागाव दुतिय, धनश्री मोरे तृतीय विजयी ठरल्या. 


चौकट २
वडोली सारख्या ग्रामीण भागात प्रथमच खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाला सर्व गावातील लोकांनी विशेष करून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवून मोठ्या हिरीरीने या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल सर्व महिलांचे आभार व प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम घेवून महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. 
          - पत्रकार सतिश काळे,
    अध्यक्ष आधार फाऊंडेशन वडोली, 
  राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका प्रसिध्दी प्रमुख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा