पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाचे सहशिक्षक माने यांना कार्यक्षम गुरुकुल प्रकल्प प्रमुख पुरस्कार प्रदान
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे नितीन विश्वंभर माने यांना रयत शिक्षण संस्थेतर्फे मा बी एन नलावडे यांच्या नावाने दिला जाणारा कार्यक्षम गुरुकुल प्रकल्प प्रमुख हा पुरस्कार उंडेगाव शाखेचे स्कूल कमीटीचे चेअरमन तुकाराम पाटील यांच्या हस्ते व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन संजीवकुमार पाटील, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, सहहयाक विभागीय अधिकारी सुरेशकुमार गोडसे,यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला. तर पिलीव येथे कर्मवीर जयंती सोहळयात यानिमित्त पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य खिलारे व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. माने सर हे पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयात गुरुकुल विभागप्रमुख म्हणुन काम पाहत आहेत कोरोना काळात विदयालय बंद असतानाही त्यांनी विदयार्थीनचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आनलाईन पद्धतीने विदयार्थीना शिक्षण दिले .यामुळे विदयार्थीनचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले .आनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आलेल्या रोझ प्रकलपात त्यांनी मोलाचा सहभाग नोंदविला. माने सर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमीटी,विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कापसे,पर्यवेक्षीका मोरे,शिक्षक,विदयार्थी, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांचयाकडुन त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो - कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाचे माने सर यांचा सत्कार करताना खिलारे व इतर मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा