Breaking

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखान्याचा मोळी पुजन कार्यक्रम संपन्न ,दुसरा हप्ता १५० रुपये



राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखान्याचा मोळी पुजन कार्यक्रम संपन्न  ,दुसरा  हप्ता  १५० रुपये 


                                           पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस - राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखान्याचा १२ गळीत हंगामाची सुरूवात  मा आ अनिल भाऊ  बाबर,चेअरमन  एन शेषागिरीराव, व्हा चेअरमन  बाळासाहेब  कर्णवर पाटील, शिवाचार्य  माढेकर महाराज, हरिनंदन महाराज, शिवाचार्य  महाराज, बापुसाहेब  देहुकर महाराज, वारकरी  साहीत्याचे अध्यक्ष  विठ्ठल पाटील, सोलापूर जिल्हा  भारतीय जनता पार्टी  महीला आघाडीच्या  अध्यक्षा  ज्योतीताई पाटील, संचालक  उदयजी जाधव,व सर्व  संचालक, सुरुवातीला  उपस्थितांच्या  हस्ते  मोळी पुजन तसेच  बैलगाडी च्या  मिरवणुकीने तसेच  कार्यक्रमाची सुरुवात  श्री  श्री  रविशंकर  महाराज  प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन  करणयात आले. यावेळी  राजेवाडीचे सरपंच  प्रशांत  शिरकांडे,इटकीचे सरपंच  कृष्णात सावंत,हिंगणीचे सरपंच  सत्यवान  ढेकळे,बचेरीच्या सरपंच  राणीताई गोरड, जनरल मॅनेजर  रामाराव,एच आर सचिन  खटके, सर्व  खातेप्रमुख  यावेळी  उपस्थिती होते.यावेळी  उदय जाधव,यांनी कारखान्याचा लेखाजोखा मांडला,माढेकर महाराज, शिवाचार्य महाराज, बापुसाहेब  मोरे महाराज यांनी शुभाशीर्वाद दिले.विठ्ठल पाटील, एन शेषागिरीराव, व्हा चेअरमन  बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर आ अनिल बाबर यांनीही कारखान्याचे कौतुक केले.यावेळी  दिपावली साठी गतवर्षी  गाळपास आलेल्या  ऊसास १५० रुपयाचा दुसरा  हप्ता  जाहीर  केला यामुळे  गेल्या वर्षी  गाळपास आलेल्या ऊसास  पहिला हप्ता  २५०० व दुसरा  १५० असा २६५० रुपये  एवढा दर देणयात आला आहे.मात्र यावर्षी  प्रचंड  दुषकाळाचे सावट आहे  ऊसाचे क्षेत्र  कमालीचे  घटले आहे  तर शेतकरी  प्रचंड  अडचणीचा सामना  करीत  आहे  यावेळी  शेतकऱ्यांना  चांगला  दर म्हणजे  नक्की  किती  अशी चर्चा  शेतकऱ्यांनमध्ये होत आहे. यावेळी  सुत्रसंचालन  रघुनाथ  देवकर  व सुनील  सावंत यांनी केले.    फोटो - राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखान्याच्या  मोळी पुजन  प्रसंगी आ अनिल बाबर,चेअरमन  एन शेषागिरीराव, व्हा चेअरमन  बाळासाहेब कर्णवर पाटील, सर्व  संचालक  व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा