Breaking

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

श्री तुळजाभवानी रुपातील कुर्डुवाडीचे "गावदेवी मंदिरात" नवरात्रात शष्टी ते दस-यापर्यत सकाळीच"सुर्य किरणोत्सव"*




*श्री तुळजाभवानी रुपातील कुर्डुवाडीचे "गावदेवी मंदिरात" नवरात्रात शष्टी ते दस-यापर्यत सकाळीच"सुर्य किरणोत्सव"*


      *नवरात्रात असा उत्सव साजरा करणारे कुर्डुवाडीतील "गावदेवी मंदिर"देशातील एकमेव मंदिर...*
     *नवरात्रात घटस्थापनेपासून दस-यापर्यत रात्रंदिवस महिलांसह भाविकांची अलोट गर्दी....*
    *चौधरी कुटुंबीय परंपरेने सांभाळतात पौरिहात्य....*

कुर्डुवाडी प्रतिनिधी /अरुण कोरे. पत्रकार

 कुर्डुवाडी: कुर्डुवाडी शहरात कुर्डुवाडी-टेंभुर्णी रोडवर तुळजाभवानी रुपातील गावदेवीचे मंदिर आहे.दररोजच्या प्रमाणे नवरात्रामध्ये विशेषतः शहर व परिसरातील पंचक्रोशीतून महिलांची अलोट गर्दी या मंदिरात दर्शनासाठी होते.
       स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी स्थापीत या गावदेवी मंदिराची पूजा अर्चा श्रीमती शांताबाई चौधरी व त्यांचे कुटुंबीय भक्तीभावाने व सेवाभावी वृत्तीने मनोभावे निस्वार्थपणे आजही करत आहेत.
        या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सोवात शष्टीपासून दस-यापर्यत सकाळी सकाळी सव्वा सात ते साडेसात पर्यंत सुर्यांची किरणं देवीच्या मुर्तीवर पाच दिवस पडतात व अक्षरशः देवीची मूर्ती सुर्यकिरणांनी न्हाऊन निघालेली असते.
      याबाबत आमच्या प्रतिनिधीने सर्वत्र चौकशी केली असता नवरात्रातच सुर्यकिरणांनी न्हाऊन निघणारे देशातील एकमेव मंदिर व तुळजाभवानी रुपातील गावदेवीची मुर्ती असणारे ठिकाण असल्याचे सांगण्यात येते.नवसाला पावणारी व इच्छापूर्ती करणारी गावदेवी असल्याची आख्यायिका महिला वर्गात आहे.
    नवरात्रात पूजा-अर्चे बरोबरच, पहाटेची काकड आरती,मळवट,धुपदिप आरती,आराधी देवीची गाणी,होमहवन,दिवट्या-जन जागरण-गोंधळ असा कार्यक्रम नित्य नियमाने रात्रंदिवस चालू असतो.
      नवरात्रातील उपवासही अठरा पगड जातीतील कुर्डुवाडी सारख्या काॅस्माॅपालीटीन शहरात (मुंबई सारखे)इतर सर्व धर्मीयही भक्तीने करताना दिसून येते.
   छोरिया टाऊनशिप जवळील गोरेवस्ती पासून श्री पोतकादेवी व कुर्डुवाडीतील गावदेवीची पालख्या जुन्या लऊळ रोडवरील विजयादशमीच्या दिवशी सीमेवर भेटून सीमोल्लंघन करतात.त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरुन सवाद्य मिरवणुकीने श्री.विठ्ठलरखुमाई-मारुती मंदिर येथे स्थान घेऊन राऊळ मठात विसावा घेतला जातो.व त्यानंतरच घरोघरी आपट्यांची पानें देऊन सीमोल्लंघनाचा उत्सव साजरा करण्यात येतो.अशी शहरातील नवरात्रोत्सोवाची  वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आजही भक्तीभावाने सर्वधर्मसम भावाने सुरू आहे.
   आजही पंचाहत्तरी उलटून गेली असली तरी श्रीमती शांताबाई प्रभाकर चौधरी या उत्साहात मंदिराचे व देवींचे पौरिहात्य परंपरेने व सुसंस्कृतपणे रात्रंदिवस सांभाळतात.त्यांना दोन सुना नंदाबाई व अनुसया,नाती ऋतुजा,मानसी आदीं व परिसरातील भक्तगण मदत करुन विशेष परिश्रम घेताना दिसून येतात.
     नवरात्रात विशेष सुशोभीकरण मंदिर परिसरात करण्यात आलेले असते.(अरुण कोरे पत्रकार कुर्डुवाडी.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा