Breaking

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार दत्तात्रय फाळके यांची निवड*



*युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार दत्तात्रय फाळके यांची निवड*

तडवळे ता.खटाव येथील पत्रकार दत्तात्रय फाळके ( D.S.P ) यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार  यांनी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केलेल्या सामाजिक , पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सविस्तर आढावा घेऊन त्यांची निवड केली. कार्यकारिणी निवडीच्या कार्यक्रमावेळी ते  बोलत असताना पत्रकार दत्तात्रय म्हणाले की या पदास योग्य तो न्याय मिळवून देईन तसेच संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. राष्ट्रीय अध्यक्ष कचकलवार  यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला पद दिले ही माझी पत्रकारिता क्षेत्रातील कामाची पोचपावती आहे असे पत्रकार दत्तात्रय फाळके म्हणाले. पत्रकार दत्तात्रय फाळके यांची सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन व कौतुक करून त्यांना सर्व पत्रकार बंधूनी , हितचिंतकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा