Breaking

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

माढा मतदारसंघातील हायब्रीड ॲन्युईटी योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत रस्त्यांचे कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता- आ.बबनराव शिंदे



माढा मतदारसंघातील हायब्रीड ॲन्युईटी योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत रस्त्यांचे कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता- आ.बबनराव शिंदे

 बेंबळे।प्रतीनीधी।                       

माढा विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग 201 माढा- उपळाई  (बु)-बावी-मोडनिंब-करकंब-उंबरे-नेवरे-माळखांबी-वेळापूर ते प्ररामा 15 रस्ता रा.मा.395 (माढा ते वेळापूर) व कंदर-दहिवली-निमगाव-पिंपळनेर-उजनी-वरवडे-परिते-बेंबळे- कान्हापुरी-उंबरे(पा)-उंबरे(वे)-नेवरे-नांदोरे-कुरोली-शेवते-भोसे-पांढरेवाडी-मेंढापूर-रोपळे-तुंगत-सुस्ते या रस्त्यांचे कामासाठी हायब्रीड ॲन्युईटी योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मान्यता मिळाली असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
                      अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी राज्य मार्गाची दर्जोन्नती करून राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करण्यात आलेले असून त्याची कामे सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग 201 माढा ते राज्यमार्ग 395 (माढा ते वेळापूर) या मार्गे वाहतूक सुरू आहे. परंतु  या मार्गावरून अवजड वाहतूक करणा-या वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होत आहे. तसेच या मार्गाचा वापर तुळजापूर या तिर्थक्षेत्रास जाणेसाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. तसेच कंदर-दहिवली-निमगाव-पिंपळनेर-उजनी-वरवडे-परिते-बेंबळे- कान्हापुरी-उंबरे(पा)-उंबरे(वे)-नेवरे-नांदोरे-पटवर्धन कुरोली-शेवते-भोसे-पांढरेवाडी-मेंढापूर-रोपळे-तुंगत-सुस्ते हा रस्ता पंढरपूर तिर्थक्षेत्रास मिळत असल्याने लाखो वारकरी या मार्गाचा वापर करीत आहेत. या तसेच या भागामध्ये केळी,डाळींब,ऊस या सारख्या पिंकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून या भागात एम.आय.डी.सी.मुळे औद्योगिक क्षेत्राला  चालना मिळाली आहे. या दोन्ही रस्त्यांची सुधारणा झाल्यास या मार्गावरील अवजड वाहने, प्रवाशी व भाविकांना वाहतूकीच्या दृष्टीने सुलभता  येणार आहे. या दोन्ही मार्गांचा हायब्रीड ॲन्युईटी योजनेत समावेश करून या मार्गाची दर्जोन्नती करणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता.
                  त्यानुसार या रस्त्यांचे कामासाठी हायब्रीड ॲन्युईटी योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मान्यता मिळाली आहे. या रस्त्यांचे कामाबाबत लवकरच पुढील कार्यवाही होणार आहे. या रस्त्यांचे कामास मंजूरीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा