Breaking

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

टेंभूर्णी मध्ये आम आदमी पार्टी कडून संविधान दिन व 11 वा पक्ष स्थापन दिवस साजरा*



*टेंभूर्णी मध्ये आम आदमी पार्टी कडून संविधान दिन व 11 वा पक्ष स्थापन दिवस साजरा*


 टेंभूर्णी येथे आम आदमी पार्टी पक्ष कार्यालयामध्ये संविधान दिन आणि आप पक्षाचा 11 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2012 साली आप पक्ष स्थापन करण्यात आला होता. 10 वर्षात च आप हा राष्ट्रीय पक्ष झाला. दिल्ली मध्ये 70 पैकी 62 आमदार आणि पंजाब मध्ये 117 पैकी 92 आमदार आप चे असून त्या ठिकाणी अनेक लोकोपयोगी कामे सरकारने केली आहेत.
     महाराष्ट्रात देखील दिल्ली व पंजाब सारखे आम आदमी पार्टीचे सरकार आणणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आपचे नेते अजित फाटके पाटील यांनी केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच यावेळी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमासाठी अजित फाटके पाटील, गगन गोडसे सर, योगेश शिंदे, अनंत घळके सर, महारुद्र तोडकर, योगेश नवले, स्वप्नील लोंढे, सोहम व्यवहारे, शिवाजी चव्हाण, अनिल राऊत, संतोष बागवाले इ. मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा