कुसमोड गावची कन्या पल्लवी जाधव ( गिरमे) बावडा गावच्या सरपंचपदी विराजमान
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस- माळशिरस तालुक्यातील कुसमोड गावची कन्या पल्लवी रणजित गिरमे हिने इंदापूर तालुक्यातील बावडा हया सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत थेट जनतेतुन सरपंच पदाच्या निवडणुकीत तब्बल १४३२ मतांनी दैदीप्यमान विजय संपादन केला.भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने याठिकाणी विजय संपादन केला यामध्ये कुसमोड गावची सुभाष केरबा जाधव यांची कन्या पल्लवी हिने सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय संपादन केला या विजयाबद्दल तिचे पिलीव, झिंजेवस्ती ,कुसमोड परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,समाजबांधव, यांच्याकडुन अभिनंदन होत आहे. लवकरच कुसमोड येथे तिचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. फोटो - पल्लवी गिरमे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा