Breaking

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

करमाळा तालुक्यातील कोर्टी परिसरात खुलेआम देहविक्री**कोर्टी परिसरातील लकी लॉज चालकाचा प्रताप पोलिसांच्या आशीर्वादाने चालतोय जोरात वेश्याव्यवसाय*


*करमाळा तालुक्यातील कोर्टी परिसरात खुलेआम देहविक्री*


*कोर्टी परिसरातील लकी लॉज चालकाचा प्रताप पोलिसांच्या आशीर्वादाने चालतोय जोरात वेश्याव्यवसाय*

टेंभुर्णी/प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील कोर्टी गावामध्ये लकी लॉजवर करमाळा पोलिसांच्या आशीर्वादाने रात्रंदिवस वेश्या व्यवसाय चालू असुन 
या भागातील अल्पवयीन शाळकरी मुले वेश्या व्यवसायाच्या आहारी गेल्याचे प्रमाण वाढले असून या व्यवसायाकडे करमाळा पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे  या लॉज मध्ये कर्नाटक, परप्रांतातून बंगाल, मुंबई या भागातून एजंटा मार्फत कोर्टी येथील लकी लॉजवर मुली देहविक्री करण्यासाठी आणल्या जात  असून या मुलीकडून रात्रंदिवस देहविक्री करून घेतली जात असून यामुळे शाळकरी मुले व त्या परिसरातील अनेक तरुण पिढी वाया जाऊ लागली आहे 

या लकी लॉजवर अनेक दिवसापासून वेश्याव्यवसाय चालू असून या लकी लॉज वरती सात ते आठ देहविक्री करण्यासाठी मुली असून एका ग्राहकांकडून  एका मुलीसाठी बाराशे ते पंधराशे रुपये घेतले जातात तसेच एक तासासाठी दोन हजार रुपये रेट घेतला जातोय तर एका रात्रीसाठी पाच हजार रुपये घेत असल्याचे समजते या लॉज वरती आठ ते पंधरा दिवसाला देह विक्री करणाऱ्या मुली बदलल्या जातात त्यामुळे त्या भागातील तरुणांमध्ये  व शाळकरी मुलांमध्ये लकी लॉजवर वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजकडे तरुणाई चे लक्ष लागले असून बंगाली मुलीकडून तर जबरदस्तीने व्यवसाय करून घेत असल्याचे समजते आशा एजंट लोकांना बेड्या ठोकण्यासाठी करमाळा पोलीस का टाळाटाळ करत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांत बोलले जात आहे ? या मागे कोणाचा वरद हस्त आहे की जेणेकरून पोलीस या ठिकाणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत 

यामुळे करमाळा परिसरातील जनतेचा करमाळा पोलिसांवरील विश्वास संपत चालला असून या मुळे कायदा व सुव्यवस्था बिगडत चालली आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य पडत आहे ? कारण करमाळा तालुक्याचे शेवटचे गाव व पुणे जिल्हा सीमा जवळ असलेले कोर्टी गाव असून या गावाला महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. तसे करमाळा तालुक्याची ओळख शैक्षणिक, संस्कृती व राजकीय म्हणून करमाळ्याची ओळख आहे मात्र या कोर्टी गावामध्ये लकी लॉजवर चाललेल्या वेश्याव्यवसायामुळे नवीन ओळख होऊ लागली आहे या लॉज च्या ओळखीमुळे  करमाळा तालुक्याला कलंक लागत चालला असून यामुळे भावी तरुणाई पिढी बिघडत चालली असून या भागात लकी लॉजवर कस्टमर कोण घेऊन जात असेल तर त्यांनाही कमिशन दिले जात असल्याची सध्या चर्चा असून या या व्यवसायामुळे कोर्टी परिसरातील नागरिकांतून तीव्र  नाराजी पसरली असून जर हा वेश्याव्यवसाय करमाळा पोलिसांनी नाही बंद केला तर या भागातील विविध संघटनाच्या वतीने करमाळा पोलीस ठाण्यावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा