सकल मुस्लिम समाज करमाळा तसेच हाजी हाशमुद्दीन तांबोळी चारिटेबल ट्रस्टच्या वतीने झाला केम कंदर गौंडरे येथील नूतन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार संपन्न
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सकल मुस्लिम समाज करमाळा यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील कंदर तसेच केम येथील नवनिर्वाचित सरपंच तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा भव्य असा सत्कार करमाळा येथील कमलादेवी औद्योगिक वसाहत येथील तांबोळी यांच्या फार्म हाऊस वर मोठ्या उत्साहात पार पडला
करमाळा येथील औद्योगिक वसाहतीत करमाळा तालुक्यातील केम, कंदर व गौंडरे ग्रामपंचायत मध्ये निवडुन आलेले लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार समारंभ ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष तसेच करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष याशिवाय पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहरं उपाध्यक्ष उद्योजक हाजी उस्मानशेठ
तांबोळी यांच्या शुभहस्ते कंदर येथील नवनिर्वाचित सरपंच मौलासाहेब मुलाणी तसेच केम येथील नूतन युवा उपसरपंच सुलतान मुलाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, केम ग्रामपंचायत चे उपसरपंच सुलतान मुलाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौंड, कंदरचे उपसरपंच अमोल भांगे, ग्रामपंचायतचे सदस्
रशीद शेख, महावीर तळेकर, माजी उपसरपंच अखलाख जहागीरदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, आतीक बेग, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी बोलताना हाजी उस्मान शेठ तांबोळी म्हणाले की, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पाच वर्षाच्या आपल्या कारकीर्द मध्ये स्वच्छ तसेच नवलौकिक कार्य करावे आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत करमाळा तालुक्यात मुस्लिम समाजाचे बांधव सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदावर विराजमान होत आहे. हे एक समाज बांधवांसाठी कौतुकास्पद बाब आहे. असे शेवटी तांबोळी बोलताना म्हणाले याचवेळी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांनीही उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांना योग्य मार्गदर्शन केले
कंदर ग्रामपंचायत चे मौला साहेब मुलाणी (सरपंच कंदर ग्रा.पं.), अमर तात्या भांगे (उपसरपंच कंदर ग्रा.पं.) अखलाख जहागीरदार (मा. उपसरपंच), दुल्हेखान शेख (ग्रा.पं. सदस्य), दिलदार मुलाणी (ग्रा.पं. सदस्य), इकबाल हवालदार (ग्रा.पं.सदस्य) आदींचा यावेळी हाजी उस्मान शेठ तांबोळी तसेच हाजी अल्ताफ शेठ तांबोळी या दोघा बंधूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी सुलतान रमजान मुलाणी उपसरपंच केम, अच्युत काका पाटील, सागर राजे दौंड, महावीर आबा तळेकर, महेश तळेकर, गोरख काका पारखे, विजयसिंह ओहोळ, सागर कुर्डे, शरद वैभासे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार युवा उद्योजक अमीर शेठ तांबोळी यांनी मांडले
सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खलील बागवान, इदाज वस्ताद, मुख्तार पठाण, आतिक बेग, अमजद बागवान, तोफिक शेख, जॉनटी पठाण, मौला तांबोळी, सनी पवार, अजिज शेख, अकबर शेख, अलीखान पठाण, वाजिद शेख, साबीर तांबोळी, इमरान कुरेशी, अफरोज पठाण, तसेच सुनील कोथिंबिरे व प्रशांत अलाट यांनी विशेष परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा