कन्हेरगांव ग्रामस्थांच्या वतीने शिवकन्या खोचरे यांचा सत्कार .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
कन्हेरगांव तालुका माढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका शिवकन्या रघुनाथ खोचरे यांना पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार मिळाल्याबद्दल कन्हेरगांव ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक विष्णू मोरे महाराज यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी मुख्याध्यापक किशोरकुमार बगाडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे , उद्योजक सतिश हांडे , ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील , सदस्य सुशांत केदार , वैभव मोरे , अमित खोचरे , गजानन मोरे , शाळा समितीचे माजी अध्यक्ष संजय डोके , अखिल भारतीय कोळी सेनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब कोळी , राजेंद्र केदार , संजय आगलावे , पद्माकर काशीद , अजय केदार , बबलू डोके , भीमराव धुमाळ , अक्षय माने , महेश माने , संजय पाटील , काकासाहेब खोचरे , सुधीर डोके , दिनेश उरमोडे , प्रमोद शिंदे , ज्योतीराम केदार , नागनाथ शिंदे , सतीश शहापुरे , शिवदास कुबेर , इंदुमती गायकवाड , सविता साळुंखे आदी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा