Breaking

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

रायगड बघण्याचे स्वप्न आदित्यचे अधुरे राहिले!


रायगड बघण्याचे स्वप्न आदित्यचे अधुरे राहिले!



महाड (मिलिंद माने) छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जायचे म्हणून दुपारच्या सत्र ऐवजी सकाळच्या सत्रात जाऊन किल्ले रायगडावर जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाड तालुक्यातील चोचिदे गावातील आदित्य मोरे याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले
महाड तालुक्यातील चो चिदे गावातील आदित्य मोरे हा 22 वर्षाचा तरुण ब्लू जेट हेल्थ केअर कंपनी त काही महिन्यापूर्वी कामाला लागला होता 3 नोव्हेंबर रोजी आदित्यची कामावर जाण्याचे दुपारच्या सत्रात नियोजित होते मात्र किल्ले रायगडावर जाण्यासाठी त्याने दुपारच्या 17 ऐवजी सकाळच्या सत्रात कामावर जाण्याचा निर्णय घेतला
महाड औद्योगिक वसाहती मधील ब्लू जेट हेल्थकेअर  कंपनीत कामावर जाण्यासाठी सकाळची निघालेला आदित्य मोरे याचा शुक्रवार 3 नोव्हेंबर चा दिवस अखेरचा ठरला घरात एकुलता एक असणारा आदित्य मोरेच्या अचानक जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आदित्य मोरे यांच्या जाण्याने त्याचे वडील हतबल झाले आहेत त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता हे असे अघटीत होईल असे त्यांना देखील वाटले नव्हते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा