Breaking

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार.. निलेश गायकवाड..



वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार.. निलेश गायकवाड..      


      श्रीगोंदा: नितीन रोही,

वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष (दक्षिण अ.नगर) निलेश गायकवाड यांनी केले. ते श्रीगोंदा येथे पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी आयोजीत पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, वंचित ही एक सामाजिक चळवळ आहे. या सामाजिक चळवळीमध्ये बुद्धीजिवी वर्ग पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे. आता आपणा सर्व युवकांची जबाबदारी आहे की, संविधान वाचवायचं किंवा संपवायचं..! सर्वांनाच संविधानाच्या माध्यमातून न्याय आणि हक्क मिळणार आहेत. हे संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी चुकीचं काम केल्यास, त्यांची पाठ राखण केली जाणार नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इथून पुढे सर्व ताकतीनिशी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुका लढवणार आहोत. कोणत्याही राजकीय प्रक्रियेमध्ये वंचित माघे राहणार नाही. असे त्यांनी नमूद केले.

या बैठकीच्या निमित्ताने युवा जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे सह सर्व नवनिर्वाचित युवा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  

यावेळी नूतन युवा जिल्हा उपाध्यक्ष(दक्षिण अ.नगर) सचिन घोडके यांनी शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच, आपसातील हेवेदावे सोडून एक दिलाने काम करा, प्रत्येक गावात पक्षाची शाखा बांधणी करा, ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाची ताकत वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी एक जुटीने काम करा. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारुन येणाऱ्या आगामी निवडणूक लढाईसाठी सज्ज राहावे.. असे उपस्थीत पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.. 

यावेळी विवेक घोडके, शेखर घोडके, चंपालाल घोडके, संतोष जौंजाळ, शिवाजी पोटे, दत्ता घोडके, कांतीलाल घोडके, सिद्धार्थ घोडके, मच्छिंद्र घोडके, प्रशांत घोडके, नवनाथ भोसले, आबा रामफळे, राहुल भोसले (चेअरमन), तुषार चव्हाण, साळवे सर, प्रेम जाधव, (शहराध्यक्ष) लक्ष्मण भोसले, विलास घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सचिन घोडके यांची नूतन युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल उपस्थीत पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देत एक लढाऊ कार्यकर्ता संघटनेत सामील झाल्याने निलेश गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता म्हणुन सचिन घोडके यांचे आंबेडकरी चळवळीत श्रीगोंदा तालुक्यात नावं आहे. ते अपेक्षित व वरिष्ठ सांगतील असे आंबेडकरी विचारांचे कार्य करतील.. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थीत केलेल्या सर्व प्रश्नानां सकारात्मक उत्तर देत पत्रकार परिषद संबोधित केली.
 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जौंजाळ (तालुकाध्यक्ष) यांनी केले. तर, (शहराध्यक्ष) लक्ष्मण भोसले यांनी आभार मानले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा