माढा विधानसभा मतदारसंघातील वीजेच्या कामासाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर.
-आ.बबनदादा शिंदे
टेंभुर्णी/प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांना वीजेच्या कामासाठी रक्कम रू. 2 कोटी निधी मंजूर झाला असून सदरच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे आ.बबनदादा शिंदे यांनी सांगीतले.
पुढे बोलताना आ. शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागातील वीजेच्या संदर्भातील ॲडीशनल डीपी व इतर वीजेच्या समस्यांबाबत आपण वारंवार मागणी केलेली होती. ग्रामीण भागात ॲडीशनल डीपी ची कामे झाल्यांनंतर शेतक-यांचा वीजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे तसेच त्यांना उच्च दाबाने वीजेचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
यामध्ये माढा तालुक्यातील दारफळ- एकवीराई गावठाण ॲडीशनल, वडाचीवाडी-बाबर नकाते ॲडीशनल, बावी-ॲडीशनल देवपुजा व सचीन मोरे ॲडीशनल, परितेवाडी-धनंजय शिंदे ॲडीशनल, सुर्ली-गौतम सरडे ॲडीशनल, अकुंभे-गायरान ॲडीशनल व रणदीवे ॲडीशनल, उपळाई(खु.)-मोहीते ॲडीशनल व जाधव ॲडीशनल, भेंड-जोशी परबत ॲडीश्नल, जाधववाडी-काटे ॲडीशनल, अकोले(खु.)-प्रकाश घाडगे ॲडीशनल, मोडनिंब-सोलंकर ॲडीशनल , उजनी मा.-सुरवसे ॲडीशनल, व मौजे आढेगांव,लऊळ, उपळाई (बु.) व मानेगांव या गावातील विद्युतीकरणाच्या विविध कामांना निधी मंजूर झाला आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील बार्डी-टीळेकर ॲडीशनल, पिराची कुरोली-भुई वस्ती ॲडीशनल, नारायण चिंचोली-कुंभार ॲडीशनल, शेगांव दुमाला-ॲडीशनल जनार्धन अटकळे व करकंब येथील भैरवनाथ मंदीराजवळील LT लाईन शिफ्टींग करणे व माळशिरस तालुक्यातील माळखांबी-चव्हाण ॲडीशनल, माळीनगर-संभाजीनगर ॲडीशनल,लवंग-माळेवाडी ॲडीशनल या कामांचा समावेश असून माढा विधानसभा मतदारसंघासाठी एकुण 2 कोटी निधी मंजूर झाला आहे व या कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. मंजूर झालेली कामे लवकरच सुरू होऊन त्या ठिकाणच्या शेतक-यांना पुरेशा दाबाने वीज मिळण्यास मदत होणार असल्याचे आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा