कुर्डुवाडी ते महाबळेश्वर एसटी बस सेवा चालू करण्याची मागणी
*AJ 24taas News Maharashtra
कुर्डूवाडी प्रतिनिधी /
कुर्डूवाडी ते महाबळेश्वर एसटी बस चालू करण्याची मागणी माढा तालुक्यातील नागरिक महिला मधून तसेच तरुण युवा पिढीकडून ही होत आहे.
कारण या भागातून जेवढे आई तुळजाभवानी मातेला दर्शनासाठी जातात त्याच पद्धतीने माढा तालुक्यातील अनेक नागरिक मांढरादेवीला अर्थात काळुबाईला दर्शनासाठी जातात मात्र मांढरादेवी जाण्यासाठी माढा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक महिला व भाविकांना चार ते पाच वेळा एसटी बस बदलावी लागते तसेच थेट जायचे असेल तर एक तर पुण्यामध्ये स्वारगेटला जावे लागते आणि तिथून पुढे वाईला जावे लागते त्यामुळे मांढरदेवी ला जाताना अनेक भाविकांचे हाल होत आहेत.त्यासाठी कुर्डूवाडी येथून सकाळी सहा वाजता जर एसटी महामंडळाने वाहन सोडले तर माढा तालुक्यातील अनेक नागरिक महिला या गाडीतून थेट प्रवास वाईपर्यंत करू शकतात.
आपल्या भागातून अनेक युवा तरुण पिढी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक किल्ला प्रतापगड हे पाहण्यासाठी अनेक तरुण पिढी जात आहे मात्र जाण्यासाठी एक तर पुण्याला जावे लागते नाहीतर पंढरपूर मार्गे साताऱ्यावरून जावे लागते त्यासाठी महाबळेश्वर पर्यटकांना जाण्यासाठी एसटी बस नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत तरी कुर्डूवाडी एसटी महामंडळाने हे वाहन सकाळी सहा वाजता व दुपारी एक वाजता अशा दोन वाहन चालू कराव्यात जेणेकरून टेंभुर्णी, अकलूज, फलटण, वठार मार्ग वाईला जाता येते तसेच दुसरा मार्ग कुर्डूवाडी टेंभुर्णी इंदापूर बारामती नीरा लोणंद खंडाळा मार्ग वाई जाता येते हे दोन वाहन जर चालू केल्या तर नक्कीच माढा तालुक्यातील नागरिक महिला व युवा पिढीतून कौतुक होईल तसेच अनेक पर्यटन दिवसभर फिरून संध्याकाळी परततात तरी रात्री महाबळेश्वर वरून एक वाजता एसटी बस जर सोडली तर ती गाडी पाचगणी वाई वटार फलटण नातेपुते माळशिरस अकलूज नरसिंहपुर टेंभुर्णी मार्ग कुर्डूवाडी ला सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचेल या गाडीमुळे माळशिरस अकलूज या भागातून येणारे रेल्वेसाठी वंदे मातरम ला येणाऱ्या प्रवाशांची सोय होऊ शकते तसेच सध्या अकलूज मधून पहाटे चार वाजता कुरवाडीला गाडी सोडण्यात आली आहे त्या ऐवजी या एसटीमध्ये प्रवासी येऊ शकतात
एसटी महामंडळाचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तरी कुर्डूवाडी एसटी महामंडळाने तातडीने कुर्डूवाडी वाई महाबळेश्वर एसटी बस चालू करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा