*उजनी (टें) - एनटीपीसी पंप पर्यंतचा रस्तासाठी मेटे यांचे आमरण उपोषण*
*धरणग्रस्त मुलांना एनटीपीसी नोकरीत घावे*
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी एनटीपीसी सोलापूर यांचे पंप हाऊस उजनी (टें) या ठिकाणी आहे. सन 2012 ला या पंपाचे काम चालू झाले. सन 2016 ला पंपाऊचे काम पूर्ण होऊनही उजनी ते पंप हाउस पर्यंतचा बारा वर्षे रस्ता तसाच आहे. हा रस्ता त्वरित व्हावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश मेटे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 19 डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार माढा व माजी खासदार राजू शेट्टी तसेच पोलीस निरीक्षक टेंभुर्णी यांना देण्यात आले आहे.
उजनी ते पंप हाऊस पर्यंतचा रस्ता इतका खराब आहे त्यावरून हजारो ट्रक, टेलर, अवजड वाहनाची वाहतूक या रस्त्यावरून करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता हा नादुरुस्त आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम करण्यात आले नाही. एक वेळी अधिकारी नुसते रस्ता करण्याचे आश्वासन देत आहेत एनटीपीसी यामध्ये लक्ष घालण्यास अनुकूल दिसत नाही. सध्या पंप हाऊस हा पूर्ण क्षमतेने चालू असून एनटीपीसीआरस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. एनटीपीसी कडे जाणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेला आहे. तरी या शेतकऱ्यांच्या मुलांना एनटीपीसी मध्ये नोकरी मिळावी. त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. यासाठी स्थानिक युवकाची नेमणूक करावी अशी मागणी १८ डिसेंबर रोजी पर्यंत मान्य न केल्यास तसेच एनटीपीसींनी या गोष्टीची दखल न घेतल्यास 19 डिसेंबर रोजी बारा वाजले पासून एनटीपीसी पंप हाऊस उजनी (टें) येथे उपोषणास बसणार आहे. अशा आशयाचे निवेदन 12 डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश हरिदास मेटे यांनी दिले आहे.
त्या अनुषंगाने निलेश मेटे यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे ते 19 डिसेंबर पासून आमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप मिसाळ, बापू कोकाटे, विष्णू कुंभार, माऊली चंदनकर, प्रमोद चंदनकर, भारत घाडगे, सुरेश पाटील, दिलीपराव पाटील, संतोष पाटील, नानासाहेब मेटे, ज्योतीराम मेटे, सोमनाथ तनपुरे, बाळासाहेब पाटील याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ उपोषणा स्थळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा