Breaking

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

माढ्याच्या खासदारांनी कुर्डुवाडीसाठी एक रुपयाचाही निधी न आणल्याबद्दल नागरिकात तीव्र संताप...* *निवडणुकीच्या तोंडावर अन्य नगरपरिषदांसाठी सहा कोटींवर निधी....*



*माढ्याच्या खासदारांनी कुर्डुवाडीसाठी एक रुपयाचाही निधी न आणल्याबद्दल नागरिकात तीव्र संताप.*



     *निवडणुकीच्या तोंडावर अन्य नगरपरिषदांसाठी सहा कोटींवर निधी....*
      *जनसंपर्क न ठेवण्याची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी मात्र अभिनंदन....*



: कुर्डुवाडी प्रतिनिधी:

अरुण कोरे(पत्रकार)कुर्डुवाडी

AJ 24Taas News Maharashtra 


गेल्या पाच वर्षांपासून फक्त चमकोगिरी साठीच येणारे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदारांनी पुन्हा एकदा कुर्डुवाडी नगरपरिषद हद्दीत काहीही विकासकामे जाणीवपूर्वक आणली नसून सुमारे सहा कोटीचा निधी अन्य नगरपरिषदांसाठी मंजूर करून आणलाय. पण कुर्डुवाडीसाठी त्यात एका पैशाचाही निधी नसल्याने शहर वाशियात पुन्हा राग अनावर झाला आहे.
       "वंदे भारत" रेल्वेच्या कुर्डुवाडी स्टेशनवर जातीच्या दाखल्यात अडकलेले सोलापूरचे खासदारही दोन दोन लक्झरीज करून सवाद्य मिरवणुकीने आले होते.सोलापूरला स्वागता ऐवजीं कुर्डुवाडीस का आलें हे अद्यापही माढा व सोलापूर मतदार संघातील मतदारांना न उलगडलेले कोडेच.
     पण माढ्याच्या खासदारांना माहीती होती का नव्हती माहीत नाही ते मात्र अनुपस्थित होते.कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर त्यांच्या वजनाने वंदे भारत एक्स्प्रेसलाथांबा मिळाला नाही मात्र "सोलापूर जिल्हा प्रवाशी संघटने"च्या प्रयत्नाला यश आले बध्दल असुया असावी अशीही स्टेशनवर जमलेल्या हजारो नागरिकात उघड उघड चर्चा केली जात होती.
       गेल्या पाच वर्षांत एकाद दुस-यांदा कार्यकर्त्यांच्या की (चमच्यांच्या?)गदारोळात दिसणा-या खासदारांनी पुन्हा एकदा कुर्डुवाडी शहराविषयी अनास्था दाखवल्या बद्दल शहरवासियांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
     मतदारांशी कधीही पाच वर्षांत संपर्क न ठेवण्याची प्रथा(फक्त सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोडून)सात वेळा खासदार झालेले कै.थोरातांपासून असलेली परंपरा अबाधित राखल्या बध्दल मात्र सर्वत्र मार्मिकपणे अभिनंदन केले जात आहे.
      मध्यंतरी तर सांगोला तालुक्यात खासदार दाखवा हजार मिळवा असे बोर्ड लावल्याचे पोस्ट सार्वजनिक ग्रुपमध्ये आल्या होत्या.
     निवडणुकीच्या तोंडावर अशा खासदारांनी तीनच महिन्यांपूर्वी शहराच्या उड्डाण पूलासंबंधी सुतराम माहिती नसताना गेट नंबर ३८ वर सर्व जनतेसमोर तोडलेले तारे तर जाहीरच आहे

चौकट............... 


 खासदारांनी.  कुर्डूवाडी नगरपालिकेतील कामे घेतलेली आहेत. मंत्रालयात प्रिंट मिस्टेक झाली आहे यात खासदारांची काय चूक... भाजप तालुका अध्यक्ष योगेश (बाबाराजे ) बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा