Breaking

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर.


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर.




टेंभुर्णी प्रतिनिधी: विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभाग यांच्या वतीने  डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभूर्णी येथे ६ डिसेंबर  २०२३ रोजी सकाळी १० ते ५:३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर (माढा लोकसभा विभाग) जिल्हाध्यक्ष मा.राहुल चव्हाण सर व अनेक मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या रक्तदान शिबिरात रक्तसंकलनासाठी सोलापूर येथील सोलापूर ब्लड बँक या रक्तपेढीचा सहभाग होता.
 सालाबाद प्रमाणे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने  सामाजिक बांधिलकी या भावनेतून व महामानवास अनोखे अभिवादन असा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता.यावेळी 71 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून या महापरिनिर्वाणदिनी महामानवास अभिवादन करून रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव विशाल नवगिरे ,प्रसिद्धी प्रमुख राजु वाघमारे,तालुका अध्यक्ष महादेव साबळे ,महासचिव सचिन झेंडे,उपाध्यक्ष बालाजी गायकवाड , राजकुमार वजाळे, सागर लांडगे,पत्रकार दिपक काकडे ,देविदास भोसले ,दादा गायकवाड ,विशाल मिसाळ ,ॲड.जुगल खरात ,नितीन खंकाळ ,मयूर आखाडे,विक्रम खरात, शितल बनसोडे,सागर सरोदे,आकाश गायकवाड ,किरण कांबळे ,ओंकार वाघमारे,प्रदीप थोरात, ललित रिकिबे,लखन भोसले ,योगेश वाघमारे आदी  पदाधिकारी ,कार्यकर्ते,भिमनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा