*टेंभुर्णी ग्रामपंचायत मध्ये यश संपादन केल्याबद्दल पार्टीप्रमुख रावसाहेब देशमुख यांचा सन्मान*
टेंभुर्णी प्रतिनिधी: माढा तालुक्यामधील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये टेंभुर्णी ची निवडणूक संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते या निवडणुकीमध्ये प्रथमच जन परिवर्तन विकास आघाडी च्या नावाने पॅनेल उभा करून रावसाहेब नाना देशमुख व सुरज भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी मध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करून आपल्या पार्टीचे सहा सदस्य निवडून आणून टेंभुर्णी मध्ये एक इतिहास घडवला टेंभुर्णी ची जनता रावसाहेब नाना यांच्याकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पहात आहे आपल्या कामाच्या जोरावरती त्यांनी यश संपादन केले . रावसाहेब नाना देशमुख व सुरज भैय्या देशमुख यांच्याकडे माढा तालुक्यातील कुठलीही व्यक्ती गेली तरी त्यांच्या कामाचा पाठपुरावा केला जातो यामुळेच त्यांनी आपला ठसा राजकीय क्षेत्रात चांगल्या पद्धतीने उमटवला आहे अशी जनमानसात भावना झाली आहे तसेच त्यांचे सामाजिक क्षेत्रात ही खूप मोठ्या पद्धतीचे योगदान आपल्याला पाहायला मिळते.
या यशाबद्दल चव्हाणवाडी तील ग्रामस्थांच्या वतीने व मित्रमंडळी यांच्यावतीने देशमुख पार्टीचे पार्टी प्रमुख रावसाहेब नाना देशमुख यांचा सन्मान करण्यात आला व नूतन ग्रामपंचायत सदस्य यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
यावेळी चव्हाणवाडी सोसायटीचे माजी चेअरमन राहुल चव्हाण, युवा नेते मारुती मिस्कीन, टायगर ग्रुप चे अमीर काजी, विशाल भोसले, युवा नेते संग्राम नाना चव्हाण, बँकेचे साहेब अशीप काजी, माजी उपसरपंच भाऊसाहेब इंदलकर ,अमोल नांगरे, विजय जगताप, अक्षय भोसले, व टेंभुर्णीतील सामाजिक कार्यकर्ते गोरख बाप्पा देशमुख व नूतन ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब हवलदार, शैलेश ओहोळ, टायगर ग्रुप चे लखन माने, बाळासाहेब बारवे, प्रशांत देशमुख, दादासाहेब देशमुख जयवंत देशमुख, बंडू ताटे देशमुख ,विकास देशमुख, इत्यादी उपस्थित होते व संभाजी ब्रिगेड वतीने भारत जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले व भावी वाटचालीसाठी पार्टी प्रमुख रावसाहेब नाना देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा