Breaking

रविवार, १४ जानेवारी, २०२४

ऊस व तोडणी वाहतूक बिलाची 63 कोटी रक्कम शेतक-यांच्या व वाहनमालकांच्या खात्यावर जमा.... जानेवारीत प्रति टन ५० रू, फेब्रुवारीत १००रू तर मार्चमध्ये १५० रुपये वाढीव दर देणार........आ.बबनराव शिंदे


ऊस व तोडणी वाहतूक बिलाची 63 कोटी रक्कम शेतक-यांच्या व वाहनमालकांच्या खात्यावर जमा.... 
जानेवारीत प्रति टन ५० रू, फेब्रुवारीत १००रू तर मार्चमध्ये १५० रुपये वाढीव दर देणार........आ.बबनराव शिंदे



 बेंबळे प्रतिनिधी           

                  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचे 10 जानेवारी अखेर ऊस बिल व 31 डिसेंबर अखेर ऊस तोडणी वाहतूक बील शेतकरी व वाहनमालक यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

                अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की,  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2023-24 चा गाळप हंगाम जोमाने सुरू असून युनिट नं.1 येथे प्रतिदिन 13000 ते 13500 मे.टन व युनिट नं.2 येथे प्रतिदिन 4500 ते 5000 मे.टन गाळप होत आहे. युनिट नं.1 येथे आजअखेर 9 लाख 31 हजार 584 मे.टन ऊस गाळप झाले आहे. या हंगामामध्ये युनिट नं.1 कडे सहविज प्रकल्पातून आजअखेर 3 कोटी 83 लाख 62 हजार 500 युनिट वीज निर्यात करणेत आली असून डिस्टीलरी प्रकल्पातून 1 कोटी 84 लाख 70 हजार लि अल्कोहोल व 1 कोटी 45 लाख 58 हजार लि.इथेनॉल उत्पादन झाले आहे.युनिट नं.2 येथे  आजअखेर 3 लाख 19 हजार 093 मे.टन ऊसाचे गाळप होवून सहविज प्रकल्पातून आजअखेर 1 कोटी 17 लाख 37 हजार युनिट वीज निर्यात करणेत आली आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 12 लाख 50  हजार 677  मे.टन ऊसाचे  गाळप झालेले आहे.

               या गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कडे 01 ते 10 जानेवारी या कालावधीत गाळपास आलेल्या 10 दिवसाचे ऊसास प्रति टन रू.2700/-प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापोटी  कारखान्याने 45 कोटी बँकेत जमा केले आहेत.तसेच दोन्ही युनिट कडे ऊस तोडणी वाहतूकीसाठी असलेल्या वाहनचालकांची दि.31 डिसेंबर अखेरपर्यंतची तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत. तोडणी वाहतूक बिलापोटी कारखान्याने 18 कोटी 57 लाख जमा केले आहे. ऊस व तोडणी वाहतूक बिलाची मिळून 63 कोटी 57 लाख रक्कम शेतक-यांच्या  व वाहनमालकांच्या खात्यावर जमा करणेत आले आहेत.

 चौकट -
सन 2023-24 गळीत हंगामामध्ये 16 ते 31 जानेवारी,2024 मध्ये गाळपास येणा-या सर्व ऊसासाठी जाहीर केलेप्रमाणे उत्तेजनार्थ अंतिम ऊस दरापेक्षा प्रतिटन रू.50/-, 1 ते 28 फेब्रुवारी प्रति टन रू.100/- व 1 मार्च पासून पुढे गाळपास येणा-या ऊसासाठी प्रतिटन रू.150/- प्रमाणे वाढीव ऊस दर देणेत येणार आहे. तरी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्यास पुरवठा करुन सहकार्य करावे असे आवाहन आ.बबनराव शिंदे यांनी केले आहे. 

                     सदर प्रसंगी  व्हॉइस चेअरमन वामनभाऊ उबाळे कार्यकारी संचालक संतोष डीग्रजे जनरल मॅनेजर सुहास यादव सर्व विभाग प्रमुख, सर्व संचालक मंडळ, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा