Breaking

बुधवार, १० जानेवारी, २०२४

टेंभुर्णीतील अतिक्रमण नियमित करण्याच्या संदर्भात घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*



*टेंभुर्णीतील अतिक्रमण नियमित करण्याच्या  संदर्भात घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*



टेंभुर्णी/प्रतिनिधी 

टेंभुर्णीतील विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी


टेंभुर्णी- आज जिल्हा परिषद सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.मनिषा आव्हाळे मॅडम यांची युवक नेते रावसाहेब नाना देशमुख व सुरज भैय्या देशमुख यांनी टेंभुर्णीतील विकासकामा संदर्भात भेट घेतली. टेंभुर्णी हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असणारे गाव आहे. मोठी ग्रामपंचायत असताना ही शासनाकडून अनेक कामांना निधी उपलब्ध होत नाही,आलेला निधी कमी पडत असतो. त्यामुळे अनेक विकासकामे पूर्ण होत नाहीत. आज आपण घेतलेल्या भेटीतून अनेक विकासकामांस निधी उपलब्ध करून देण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.आव्हाळे मॅडम या सकारात्मक असल्याची माहिती रावसाहेब नाना देशमुख यांनी दिली.

     या भेटी दरम्यान आपण टेंभुर्णीतील अतिक्रमण नियमित करावे यामुळे अनेकांना घरकुल बांधता येईल तसेच शहराचे ऐतिहासिक असणारी दोन्ही तळे सुशोभीकरण करण्यात यावी, गावातील अनेक ऐतिहासिक मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास स्वरूपात निधी उपलब्ध करावा, घरकुल कोटा गावासाठी वाढवून मिळावा, भूमिगत गटार व क्राँकिटीकरण करण्यास निधी उपलब्ध करावा, जि.प.शाळा व परिसर सुशोभीकरण, पर्यटन ठिकाण तसेच विविध विकासकामांस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वरील सुचित केलेल्या विकासकामांस निधी उपलब्ध करून देण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. आव्हाळे मॅडम सकारात्मक आहेत,यामुळे टेंभुर्णीतील विकासकामांस गती प्राप्त होईल तसेच गावाच्या विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे रावसाहेब नाना देशमुख यांनी सांगितले.

कोट 
आज रावसाहेब नाना देशमुख यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. टेंभुर्णीतील विकासकामांस निधी उपलब्ध करून देण्यास त्या सकारात्मक असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामांना निधी उपलब्ध होऊन कामे गतीमान होण्यास मदत होईल-सुरज भैय्या देशमुख,युवा उद्योजक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा