श्रीगोंदा तालुक्यात विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा...
पत्रकार दिनाचा आमदार व नगराध्यक्षांना विसर....
श्रीगोंदा- नितीन रोही
तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार बेलवंडी पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सायन्स फोरम कोचिंग क्लासेस चे पारे सर,राहुल विद्यार्थी वसतिगृह, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, खासदार सुजय विखे, श्रीगोंदा पोलीस स्टेशन, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप यांनी पत्रकार दिन साजरा केला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, तालुका अध्यक्ष अंकुश शिंदे, प्रेसक्लब चे अध्यक्ष विशाल चव्हाण, मिराताई शिंदे, गायत्री ढवळे, चंदन घोडके, किशोर मचे, अमर घोडके, बाळासाहेब काकडे, संजय काटे, राजू शेख, दादासाहेब सोनवणे, सुभाष शिंदे, राजू राऊत, प्रमोद आहेर, अनिल तुपे, अमोल झेंडे, आप्पा चव्हाण, नितीन रोही,दत्तात्रय जगताप, पिटर रणसिंग, योगेश चंदन, मेजर भीमराव उल्हारे, सोहेल शेख, विजय उंडे,उपस्थित होते. सर्व पत्रकार बांधवांनी ज्यांनी ज्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
चौकट-नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार दिनी पत्रकार भावना साठी दोन गुंठे जागा देण्याचे आश्वासन दिले.
चौकट-सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीचे महादेव पारे सरांनी पत्रकारांच्या मुलांसाठी फी मध्ये सवलत देण्याचे आश्वासन दिले.
चौकट-श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील एकाही पत्रकाराला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत त्यामुळे पत्रकारांमध्ये आमदारांविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे.
चौकट-तालुक्यातील व शहरातील आमदारकीचे वेध लागणाऱ्या नेत्यांना व पुढाऱ्यांना पत्रकार दिनाचा विसर पडलेला दिसून आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा