Breaking

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

अकोले बु!! - बेंबळे -घोटी-चांभारविहीर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन....13 किलोमीटर साठी अकरा कोटी रुपये मंजूर..


अकोले बु!! - बेंबळे -घोटी-चांभारविहीर  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन....


13 किलोमीटर साठी अकरा कोटी रुपये मंजूर.. 
  मीच  माढ्याचा खासदार आणी  रणजीत सिंह  शिंदे आमदार असणार . ... 


भीमा आणि सीना नदीवर बॅरेजेस साठी प्रयत्नशील खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर


 बेंबळे। प्रतिनिधी                         

                  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक- बेंबळे -घोटी- चांभार विहीर या 13 किलोमीटर लांबीच्या व 11 कोटी रुपये मंजुरी असलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माढ्याचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत उर्फ भैय्यासाहेब शिंदे बाजार समितीचे संचालक दिलीपराव भोसले  माढा तालुका  भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे माजी सरपंच कैलास भोसले  संजय पवार दादासाहेब भगत , कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण विष्णू हुंबे जयवंत भोसले मोहन लोकरे रामभाऊ शिंदे  डॉ.भीमराव पवार आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.      
                 याप्रसंगी रणजीत सिंह शिंदे म्हणाले की आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एनएच 65 ते अकोले बु.! व बेंबळे- घोटी ते चांभार विहीर  एकूण 13 किलोमीटर लांबीच्या  रस्त्याचे मुरमीकरण, खडीकरण व डांबरीकरण  काम होणार असून यासाठी अकरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत , या कामाचे भूमिपूजन खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर  यांच्या हस्ते संपन्न होत आहे, जनतेची अनेक दिवसांची  मागणी पूर्ण होत असल्यामुळे आनंदाची आणि समाधानाची बाब आहे,  याच प्रमाणे यापुढे नऊ किलोमीटर लांबी असलेल्या बेंबळे- टेंभुर्णी या रस्त्याचे काम  देखील टप्प्याटप्प्याने न होता एक सलगपणे करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी  सर्व प्रकारच्या विकास कामाला आपल्या माढा विधान सभा मतदारसंघासाठी आजपर्यंत भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे  त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत  आपण सर्वांनी एकत्रितपणे त्यांना   निश्चित सहकार्य करायचे आहे. 
             खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर याप्रसंगी म्हणाले की ठेकेदारांनी रस्त्याचे काम चांगले करावे, मी माझ्या खासदारफंडातील निधी  संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत भरभरून दिलेला आहे व यापुढेही देत राहीन,  यापुढील काळात भीमा नदीवर चार व सीना नदीवर दोन बॅरेजेस बांधण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.  बेंबळे या बागायती परिसरातील रस्ते,  सार्वजनिक इमारती किंवा व्यायाम शाळा या सर्व बाबीसाठी यापुढेही भरघोस निधी दिला जाईल हे निश्चित. 
चौकट.....मी पून्हा माढ्याचा खासदार व  नंतर पुढे रणजितसिंह शिंदे आमदार असणार. ... 
     आपल्या भाषणात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीत  माढा लोकसभा मतदारसंघातून मी भाजपचा उमेदवार असून  निश्चित खासदार होणार आहे व त्यानंतर  आगामी पुढील काळात माढा विधानसभा मतदारसंघाचे रणजीत सिंह शिंदे हेच आमदार होणार आहेत, आम्ही दोघे मिळून एकमेकांच्या सहकार्याने जनतेच्या सार्वजनिक विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देतो. 
     या कार्यक्रमास सोमनाथ हुलगे गोरख शेळके रविराज भोसले कल्याण अनपट गोविंद भोसले रत्नाकर कुलकर्णी विश्वजीत भोसले दादा देशमुख घोटीचे सरपंच विजू पवार राजाभाऊ बागल संजय वनवे सदाशिव भोसले बांधकाम खात्याचे उप अभियंता जाधव तसेच अविनाश घाडगे टेंभुर्णी चे उपपोलीस निरीक्षक गिरीश जोग आदी मान्यवरा सह परिसरातील गावोगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा