Breaking

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

बेंबळे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 50 लाख रुपये मंजूर .... इमारतीसह पशुसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध होणे होणार.... आमदार बबनदादा शिंदे



बेंबळे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 50 लाख रुपये मंजूर .... 
इमारतीसह पशुसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध होणे होणार.... आमदार बबनदादा शिंदे 


बेंबळे। प्रतिनिधी              

            जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून माढा तालुक्यातील बेंबळे येथे अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 50 लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली . 
       वृत्तांत असा की मागील 40 वर्षापासून उजनीच्या कालव्यामुळे बेंबळे परिसर हा ग्रीन झोन( हरित पट्टा) म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु  इमारत जुनी झाली असून या मधे अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत ,त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते,  म्हणून पशुसंवर्धन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून  50 लाख रुपये मंजूर झाले असल्याचे  आमदार शिंदे यांनी सांगितले.
     बेंबळे या बागायती परिसरासाठी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी नंबर 2 अंतर्गत बेंबळे, हरीनगर, भोसलेवाडी सह माळेगाव ,अकोले बुद्रुक, मिटकलवाडी, घोटी या गावांचा समावेश होत आहे. या परिसरात शेतीला पूरक उद्योग म्हणून  मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन व्यवसाय  चालतो. या परिसरात देशी व संकरित गाई ,म्हशी शेळ्या मेंढ्या बैलअशी एकूण जनावरांची संख्या 8700 आहे व 23 दुध संकलन केंद्र असून प्रतिदिन 28 हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. गाई ,म्हशी, शेळ्या मेंढ्या, बैल इत्यादी जनावरासाठी जंताची औषधे, मिनरल पावडर, वंद्यत्व निवारण औषधे, गर्भधारणेची इंजेक्शन्स,  अँटिबायोटिक्स, बी कॉम्प्लेक्स तसेच स्टिरॉइड्स व  त्वचारोग इत्यादी साठी पशुपालकांना खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर कडे जनावरांना न्यावे  लागत आहे . या पुढे अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना होणार असल्यामुळे या परिसरातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
          माढा तालुक्यातील इतर ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी देखील अत्याधुनिक स्थिती प्राप्त व्हावी म्हणून आणखीन निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे  आमदार बबनदादा शिंदे आणि आवर्जून सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा