Breaking

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

लामजना येथे श्री खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न*


*लामजना येथे श्री खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न*


*औसा /प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी* 

लामजना येथे 09 फेब्रुवारी रोजी श्री खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेमध्ये आजूबाजूच्या खेड्यातून वारूभक्त मंडळ मानाच्या काठ्या घेऊन मोगरगा, आपचुंदा, लिंबाळा येथून येऊन कार्यक्रमाची  शोभा वाढवली. रेणापूर येथील वाघ्या मुरळीचा  कार्यक्रम झाला.  दुस-या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी मंदिराच्या मैदानात गावोगावचे वारूभक्त मंडळ मानाची काठी घेऊन नाचवत होते. संपुर्ण परीसर येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराय महाराज की जय च्या जयघोषाने दणाणला. गावातील व आजूबाजूच्या खेड्यातून यात्रेमध्ये आलेल्या भाविकांसाठी  महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वारूभक्त मंडळ, गावातील लहानथोर मंडळीनी परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा