Breaking

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

कुर्डुवाडीची वैशाली सोमासे बी.ए.एल.एल.बी.परिक्षेत सोलापूर विद्यापीठात प्रथम....*



कुर्डुवाडीची वैशाली सोमासे बी.ए.एल.एल.बी.परिक्षेत सोलापूर विद्यापीठात प्रथम....*


   *वैशालीने पटकावले सुवर्ण पदक...*
  *सोमासे कुटुंबातील एकाच घरातील तिसरी वकील....वडीलांनी तर सेवानिवृत्तीनंतर केले होते एल.एल.बी.*


 AJ 24Taas/कुर्डुवाडी,अरुण कोरे प्रतिनिधी.



 कुर्डूवाडीची वैशाली सोमासे विद्यापीठाच्या सुवर्ण पदकाची मानकरी"    
कुर्डुवाडीची वैशाली दिगंबर सोमासे या विद्यार्थिनीने सोलापूर विद्यापीठातर्फे एप्रिल/मे २०२३ या शैक्षणिक वर्षात आयोजित  बी ए एल एल बी परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून  
विधी शाखेचे सुवर्ण पदक प्राप्त करण्याचा मान मिळविला आहे.सदरहू पदक दिनांक २१.०२.२०२४ रोजी सोलापूर विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभात कुलगुरूडॉ.प्रकाश महानवर  यांचे हस्ते वैशाली सोमासे यांना प्रदान करण्यात आले. या प्रसंगी  सोलापूरचे खासदार डॉ. जयसिधेश्वर  शिवाचार्य महास्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते.
    वैशाली सोमासे ही सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी श्री. दिगंबर सोमासे यांची कन्या आहे. विशेष म्हणजे वैशालीचे
वडील दिगंबर सोमासे हे देखील गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या केंदिय अनुवाद ब्यूरोच्या सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत तसेच त्यांनी 
सेवानिवृत्तीनंतर एल एल बी ही पदवी प्राप्त केली आहे व वैशालीचे लहान बंधू अजित सोमासे हे सुद्धा एल एल बी आहेत.वैशालीचे विधी शाखेचे शिक्षण कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालय पंढरपूर या शिक्षण संस्थेत झाले आहे व हे यश प्राप्त करणारी ती या महाविद्यालयाची पहिली विद्यार्थिनी आहे .
  वैशालीच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा