Breaking

रविवार, ७ एप्रिल, २०२४

चव्हाणवाडी टें येथे चव्हाण परिवाराकडून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन*


*चव्हाणवाडी टें येथे चव्हाण परिवाराकडून  रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन* 


टेंभुर्णी प्रतिनिधी
:मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना पवित्र असतो रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव रोजा  (उपवास) करतात व अल्लाह ची मोठ्या श्रद्धेने इबादत(प्रार्थना) करतात याचेच औचित्य साधून चव्हाणवाडी येथील ॲड सचिन चव्हाण व चव्हाण परिवाराकडून काझी वस्ती येथे मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन आज सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते.

यावेळी सर्व हिंदू_मुस्लिम बांधव एकत्रित येऊन रोजा (उपवास) सोडण्यातआला.समाजामध्ये हिंदू_मुस्लिम  एकता  असल्याचे या कार्यक्रमावरून दिसून आले
या एकतेचे,उत्साहाचे व आनंदाचे वातावरण हिंदू मुस्लिम समाजाचे एकत्र मिळून रोजा सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर ऐक्याचे भाव दिसून आले. यावेळी सर्वांनी मिळून अल्लाह कडे समाजामध्ये असेच एकतेचे नाते कायम राहावे अशी प्रार्थना (दुआ)  करण्यात आली.
हिंदु_मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान पवित्र महिन्याच्या गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी चव्हाणवाडी चे सरपंच नवनाथ शिंदे,माजी उपसरपंच हनुमंत चव्हाण, सोसायटी चेअरमन चांगदेव चव्हाण, ऍड.सचिन चव्हाण, उद्योगपती आय्युबभाई पटेल,बार्डीचे माजी सरपंच दादाभाई पटेल, डॉ.शहाजहान काझी,ग्रा.पं.सदस्य.सुभाष इंदलकर,माजी सरपंच सुनील मिस्किन,सुवर्णक्रांती बँकेचे असिफ काझी,कुदरत काझी,कमाल काझी,जावेद काझी, अमिर काझी,शरिफ काझी, दिलावर काझी,अल्ताफ काझी, विजय कदम,जमाल काझी, शाहिद काझी,रोहन चव्हाण, संग्राम चव्हाण,  भारत जगताप, गणेश चव्हाण, महावीर नांगरे,बाळासाहेब चव्हाण, रमजान काझी,सागर इंदलकर,शाम नांगरे, अनिल नांगरे, भागवत खडके,मारुती मिस्किन आदी हिंदू _मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा