नगोर्ली येथील विकास सेवा सोसायटीचे मा. चेअरमन कैलास नवले यांचे विहिरीत पाय घसरून पडल्याने निधन
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील नगोर्ली येथील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कैलास विठ्ठल नवले (वय-४२) यांचे विहिरीतील विद्युतपंप सुरू करण्यासाठी जात असताना पाय घसरून विहिरीतील दगडी टप्प्यावर पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी दुपारी १.३० वा. सुमारास घडली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कैलास नवले हे नेहमीप्रमाणे शेतातील विद्युतपंत सुरू करण्यासाठी दुपारी विहिरीवर गेले होते.यावेळी ते पाय घसरून खोल विहिरीत टप्प्यावरील खडकावर पडले.यामध्ये डोकिस गंभीर मार लागल्याने व रक्तस्राव झाल्याने मयत झाले.घटनेचा माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थांनी धाव घेतली.तसेच पोहेको बिरुदेव हजारे,पोहेकॉ राजेश लांडगे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,फोन मुली,एक मुलगा,तीन भाऊ असा परिवार आहे.ते माजी सरपंच चंद्रकांत नवले व राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नवले यांचे बंधू होते.नवले हे हरहुन्नरी कार्यकर्ते म्हणून परिचित होते.त्यांच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे.चंद्रकांत नवले यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा