Breaking

बुधवार, २६ जून, २०२४

चकलांबा येथील वीज पडून तीन महिला जागीच ठार तरी एक महिला गंभीर जखमी*



*चकलांबा येथील वीज पडून तीन महिला जागीच ठार तरी एक महिला गंभीर जखमी*
चकलांबा: प्रतिनिधी ( अस्लम  कादरी)गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीज पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला,असून एक महीला गंभीर जखमी झाली आहे. 
  गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने  यमुना माणिक खेडकर वय ७०गंभीर जखमी झाली आहे.
शालनबाई शेषेराव नजन, वय ६५,
लंका हरिभाऊ नजन, वय ४५,
विजया राधाकिसन खेड़कर, वय ४२ या वीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे या चारही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला आहे.चारही महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यातील तीन महिला मृत घोषित केले आहे यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष ७० या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील  उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा