Breaking

मंगळवार, २ जुलै, २०२४

बेकायदेशीर रित्या कत्तली जर्सी गाई घेऊन जाणारा आयशर टेम्पो गोरक्षक यांनी टेंभुर्णी येथे पकडला*



*बेकायदेशीर रित्या कत्तली जर्सी गाई घेऊन जाणारा आयशर टेम्पो गोरक्षक यांनी टेंभुर्णी येथे पकडला*

 

टेंभुर्णी प्रतिनिधी:- 

बेकायदेशीर रित्या जर्सी  गाई कत्त्तली साठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो टेंभुर्णी येथे पकडण्यात आला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, टेंभुर्णी तालुका माढा येथे दिनांक 1/7/2024 रोजी सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी आयशर टेम्पो नंबर एम एच  25 ए जे 26 37 हा अकलूज चौकाकडे येत असताना अवधूत सुरेश घाटे वय 27 वर्ष ,व्यावसाय गोरक्षक, राहणार बाह्य गल्ली पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांना दिसला असता व पोलिस आमलदार शेख यांनी त्या वाहनाच्या चालकाला हाताचा इशारा करून ते वाहन कडेला थांबवून वाहनाच्या मागील हाऊद्यात चढून पाहणी केली असता.

 टेम्पोमध्ये पंधरा जर्सी गाई पांढऱ्या तांबड्या रंगाच्या गाईचे चार पाय दोरीने बांधलेले तसेच तोंड दोरीने बांधून जनावरांना कुरपणे वागणूक दिली होती. जर्सी गाईंना उपाशीपोटी ठेवून त्यांना चारा पाणि याची व्यवस्था न करता घेऊन जात असताना मिळून आले आहेत.

जर्सी गाईसह आयशर टेम्पो एकूण मुद्देमाल आठ लाख 50 हजार रुपये किमतीचा टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आलेला आहे

फिर्यादी अवधूत सुरेश घाटे यांनी आरोपी चालक शाहरुख निसार पिंजारी वय 26 वर्ष राहणार मळी गवी ,जिल्हा धाराशिव आणि त्याचा साथीदार लक्ष्मण रामचंद्र दराडे वय 23 वर्षे राहणार तुळजापूर नाका यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून  पोलीस स्टेशन येथे प्राण्यांचा छळ  प्रतिबंधक कायद्यानुसार 1960 के व महाराष्ट्र पशु संरक्षण आधी 1976 कलम 5.A 5.9 गुन्हा दाखल टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेला असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस शेख साहेब हे करीत  आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा