Breaking

गुरुवार, ४ जुलै, २०२४

पंढरपूर भागातून ॲड. मिनलताई साठे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


पंढरपूर भागातून ॲड. मिनलताई साठे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


माढा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर माढा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा व माजी आमदार व कुर्मदास सह. साखर कारखान्याचे चेअरमन श्री श्री धनाजी  साठे यांच्या सुन  माढा विधानसभा 
मतदारसंघातील पंढरपूर भागातील गावात भेटी देऊन तेथील प्रश्न जाणून घेत आहेत.



माढा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रमुख दावेदार म्हणून आज सौ मिनलताई साठे यांचे नाव आघाडीवर असताना दिसत आहे त्याचबरोबर त्यांनी मतदार संघात प्रचारात ही आघाडी घेतलेली दिसून येत आहे.त्यांनी लोकसभेच्या वेळीच विधानसभेची रंगीत तालीम घेत मतदार संघ पिंजून काढला होता व आता त्यांचा दुसरा राऊंड पूर्ण करत प्रचारात ही आघाडी घेतलेली जनतेतून बोलले जात आहे . त्यांनी काल सुस्ते , पटवर्धनकुरोली गावात भेटी देत तेथील अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द गावकऱ्यांना दिला.या गावभेट दौऱ्यात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत असून दिवसेंदिवस ती वाढत आहे. .   गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि सुस्ते गावचे सरपंच ,भीमा सहकारी साखर कारखाना चे मा.संचालक श्री.तुषार दादा चव्हाण ,ग्रा.प.सदस्य,श्री पांडुरंग कदम 
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.तानाजी नागटिळक ॲड. विजयकुमार नागटिळक , पटवर्धन कुरोली चे सरपंच श्री विष्णू मोरे,अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील,ग्रा. सदस्य श्री.हरिदास पाटील, हरून शिकलकर यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा