पिलीव परीसरात रक्षाबंधन सण मोठ्या उस्हात साजरा
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस - माळशिरस तालुक्यातील पिलीव व आसपासच्या परीसरात बहीण भावाचा अतुट नाते असणारा रक्षाबंधन हा सण लहान थोरापासुन सर्वांनी मोठ्या उस्हात साजरा केला. हया वर्षी रक्षाबंधन हा सण साजरा करताना थोडासा संभ्रम निर्माण झाला यामुळे अनेक महीलांनी दुपारी दोन नंतरचा मुहुर्त निवडला .श्रावण महीन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो.ग्रामीण भागातील महीलांनी एस टी बस तसेच इतर मिळेल त्या वाहनाने जाऊन आपल्या लाडक्या भावांना राखी बांधली .रक्षाबंधन निमीत्त राखी स्टॉलवर महीलांची मोठी गर्दी दिसत होती. तसेच मिठाई ,कापड दुकानात तसेच इलेक्ट्रिक दुकानात खरेदी करणयासाठी मोठी गर्दी दिसत होती.संपूर्ण भारत देशात हा सण पत्नी सोडुन सर्व वयोगटातील महीला ,अगदी लहान मुली सुद्धा आपल्या भावांना, वडीलांना राख्या बांधुन हा सण मोठ्या उस्हात साजरा करतात. पिलीव परीसरात हा सण अगदी पारंपरिक सांस्कृतिक वसा जोपासत मोठ्या उस्हात साजरा करणयात आला. फोटो - पिलीव ( झिंजेवस्ती) येथील चिमुकले रक्षाबंधनाचा सण साजरा करताना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा