Breaking

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

विठ्ठलराव शिंदे कारखान्यात प्रतापराव नलवडे यांची तज्ञ संचालकपदी नियुक्ती



विठ्ठलराव शिंदे कारखान्यात प्रतापराव नलवडे यांची तज्ञ संचालकपदी नियुक्ती


विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात प्रतापराव शंकरराव नलवडे रा. लऊळ यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक मंडळाची सभा दि.26/08/2024 रोजी दुपारी 2 वा संपन्न झाली. या सभेत श्री.प्रतापराव शंकरराव नलवडे रा.लऊळ यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांचे शुभहस्ते नुतन तज्ञ संचालक यांना शाल श्रीफळ देवून सन्मान करणेत येवून शुभेच्छा देण्यात आल्या.

आ.बबनराव शिंदे, संस्थापक चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने अल्पावधीत चौफेर प्रगती केलेली असून काखान्याने सातत्याने सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे हित जोपासलेले आहे. कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादन व उपपदार्थ उत्पादनात उच्चांक प्रस्थापित करून देश व राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. अशा वैभवप्राप्त कारखान्यात तज्ञ संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी  गौरवाची बाब असल्याचे मत तज्ञ संचालक प्रतापराव नलवडे यांनी व्यक्त केले.

सदरप्रसंगी कारखान्याचे उपस्थित सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर खातेप्रमुख यांनी नुतन तज्ञ संचालक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा