ब्रह्मचैतन्य पुरुष बचत गटाचे लाभांश वाटप
टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- टेंभुर्णी येथील ब्रह्मचैतन्य पुरुष बचत गटातील सदस्यांना सोमवार 9 डिसेंबर 2024 रोजी मार्केट यार्ड सभागृहात सायंकाळी 5 वा.लाभांश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी विजय कोकाटे व पंढरपूर अर्बन बँकेचे शाखाधिकारी वसंत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
बचत गटातील सर्व सदस्यांनी वर्षभर योग्य उलाढाल केल्यामुळे योग्यरीतीने वसुली केल्यामुळे प्रत्येक सभासदांना 3000 रुपये प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आला. पंढरपूर अर्बन बँकेचे शाखा अधिकारी देशमुख यांनी सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. ब्रह्मचैतन्य बचत गट हा कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँक व पंढरपूर अर्बन बँक नेहमीच तुमच्या पाठीशी असेल शंभर टक्के गटाला सहकार्य करण्याचे आश्वासन दोन्ही बँकांचे शाखाधिकारी यांनी दिले.
सदर कार्यक्रमास बचत गटाचे अध्यक्ष वैभव कुलकर्णी, सचिव उमाकांत कुलकर्णी, संचालक विनायक टल्लू, रमेश जोशी, वैभव जोशी, मिलिंद कुलकर्णी, प्रमोद पाठक, प्रतीक आरगडे, प्रल्हाद आरगडे, वैभव टल्लू, किशोर टल्लू, पिंटूकाका कुलकर्णी, महेश डिंगरे, किशोर कुरुलकर, सदाशिव ठोंबरे इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष वैभव कुलकर्णी यांनी केले व सूत्रसंचालन विनायक टल्लू यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार व चहापान घेऊन करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा