वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून फ्रिज व शैक्षणिक साहित्याचे वाटप
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाडिक भरगंडे वस्ती, टेंभुर्णी येथे दि.०५ डिसेंबर २०२४ रोजी अजिंक्य राणा औदुंबर देवकर यांचा प्रथम वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून शाळेला फ्रिज विद्यार्थ्यांना वह्या, पेन व सर्वांना अल्पोहार देण्यात आला. हा दिवस वस्तीच्या इतिहासात सुवर्णअक्षरान लिहला गेला.
अनिल देवकर पाटील यांचे नातू व औंदुबर अनिल देवकर पाटील यांच्या मुलाचा अजिंक्यराणा याचा प्रथम वाढदिवस जि.प.प्रा.शाळा महाडीकवस्ती (टें) येथे अतिशय आनंदाणे व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वही, पेन, वाटप व अल्पोपाहार देण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य आदित्य देवकर पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेमध्ये फ्रिज असावा. त्याचा उपयोग शालेय पोषण आहारासाठी अत्यंत गरजेचा आहे. त्यांनी वाढदिवसाच्या खर्च टाळून १९७ लीटरचा फ्रीज वाढदिवसानिमित्त शार्डस भेट दिला. शाळेस नेहमीच देवकर पाटील परिवाराचे सहकार्य असते. अनिल देवकर यांच्या या निर्णयाचे स्वागत शाळेचे शिक्षक वीर गुरुजी व ढगे गुरुजी यांनी देवकर कुटुंबाचे कौतुक करून आभार व्यक्त केले
सदर कार्यक्रमास नाना भैया युवा मंचचे सुरज देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ देशमुख, माजी सरपंच बाबुभाऊ महाडीक, सुधिरबापू महाडीक, ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडीक, शैलेश ओहोळ, अनिल देवकर, माऊली महाडीक, महादेव कोल्हे, महावीर महाडीक, मुख्याध्यापक संतोष वीर, सहशिक्षक शिरिषकुमार ढगे, विद्यार्थी व वस्तीवरील पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा