Breaking

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

भविष्यात माढयाची मुले ऑलम्पिकमध्ये दिसतील-विकास यादवशारदेय गुरुकुल टेंभुर्णी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न


भविष्यात माढयाची  मुले ऑलम्पिकमध्ये दिसतील-विकास यादव

शारदेय गुरुकुल टेंभुर्णी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न 


 माढा तालुक्यातील सर्व बीटमधील मुलांनी आपले केंद्र बीट स्तरावर यश दाखवून तालुका स्तरावर निवड झाली. ह्याच  ग्रामीण भागातील मुलांना सुरज भैय्या सारख्या तसेच आमदार खासदार यांच्या मार्गदर्शन खाली भविष्यात विभागस्तर, राज्यस्तर, ऑलिम्पिकमध्ये निश्चित आपले यश दाखवतील असे प्रतिपादन कुर्डूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी केले आहे.

 यावेळी ते म्हणाले की सर्व बीट मधील मुलांनी खेळ भावना ठेवून आपले कौशल्य दाखवावे . आपल्या शाळेचे केंद्राचे बीटचे नाव उज्वल करावे. शारदेय गुरुकुलने केलेल्या नियोजनाचे यादव यांनी कौतुक केले. पंचायत समिती कुर्डुवाडी, शिक्षण विभाग, ता माढा यांचे वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा शारदेय गुरुकुल टेंभूर्णी येथे गुरुवार दि 19/12/2024  रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शारदेय गुरुकुलचे संचालक व युवा नेते सुरज देशमुख उपस्थित होते. माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी कबड्डी, लंगडी, खोखो हे सांघिक तर वैयक्तिक मध्ये 100मी, 200मी.धावणे, बुद्धिबळ इ सामने घेण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शोभा लोंढे, मा. ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, गोरख देशमुख, ग्रा.पं.सदस्य वैभव देशमुख, माढा क्रीडा समन्वय संजय शिंदे, केंद्र प्रमुख संतोष वरकुटे, समीर काळे, नागेश भोसले, मनोज पवार, फिरोज मणेरी, शिवराज ढाले, शेख सर,बंडू कोळी, न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक अर्जुन खटके, रामेश्वर लोंढे, संजय काशीद, सुरेश माळी, विजय काळे, गुरुकुलचे प्राचार्य इंगोले, बुरांडे, राऊत, भारत माने, बी.आर. सी चे सुभाष आबा राऊत,अरुण गायकवाड योगिता क्षीरसागर,दीपाली माळी, कौशल्या माने, पडवळ मॅडम, भांगे,अजित काळे इ उपस्थित होते. पंच म्हणून क्रीडाधिकारी अरणचे संजय शिंदे, दिनेश बंडगर, अमर काळे, गणेश देवकते , अण्णासाहेब शिंदे, चौगुले, संजय लांडगे, नाना चोपडे, सर्जेराव बारवे, किशोर आडकर, विलास ठोंबरे, अनिल पवार,,संजय लांडगे, नाना चोपडे,शीतल देवकर दीपाली जाधव यांचे सहकार्य लाभले. क्रीडा पार पाडण्यासाठी शारदेय गुरुकुलच्या सहकारी शिक्षक यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

 चौकट

 माढा तालुक्यातील मुलांनी खेळातून आपले यश मिळवावे. सदर यश मिळविण्यासाठी आर्थिक तसेच क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी, गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्यसाठी माझ्या परीने नेहमी  खारीचा वाटा असेल.

 सुरज देशमुख, 

 संचालक,
शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल टेंभुर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा