*स्व.लोकनेते ॲड कृष्णात बोबडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 'टेंभुर्णी भूषण' पुरस्काराचे वितरण*
टेंभुर्णी : - स्व.लोकनेते ॲड.कृष्णात बोबडे यांचा स्मतिदिन 'टेंभुर्णी भुषण पुरस्कार' वितरण,१६ आशा स्वयंसेविकांना भेट वस्तू,१५५ बांधकाम कामगारांना साहित्य किट व १५० होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप,भव्य क्रिकेट स्पर्धा असे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यावेळी बोबडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श माता म्हणून जयश्री किशोर गांधी,आदर्श कुटुंब विठ्ठल कोंडीबा सपाटे,आदर्श उद्योजक भारत शिंदे,आदर्श कृषी उद्योजक म्हणून दत्तात्रय माळी तसेच आदर्श कलाकार म्हणून रिलस्टार पवन जाधव अशा पाच जणांचा सहकुटुंब मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह,शाल देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी स्व.कृष्णात बोबडे यांच्या आठवणीस उजाळा देताना जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे म्हणाले की,स्व.बोबडेदादा यांची तत्व पाळणारे नेते म्हणून ख्याती होती.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी खर्ची घातले.यावेळी शिवाजी कांबळे,संजय पाटील-भिमानगरकर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य योगेश बोबडे यांनी आपल्या मनोगतातून स्व.बोबडे यांच्या कार्यास उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.रुपेश बोबडे यांनी केले.सूत्रसंचालन सुदर्शन पाटील,युवराज वजाळे यांनी केले.
कार्यक्रमास विजयकुमार कोठारी,जि. के.देशमुख,दशरथ देशमुख,अनुराधा बोबडे,सरपंच सुरजा बोबडे,उपसरपंच राजश्री नेवसे, नामदेव धोत्रे,संभाजी पाटील,परमेश्वर खरात,रामभाऊ शिंदे,उपसरपंच सतिस नेवसे,नागनाथ वाघे, अमोल धुमाळ, दशरथ देशमुख, कल्याण पाटील,बाळासाहेब ढगे,गौतम कांबळे,दत्तात्रय देवकर,सुधीर पाटील,नागेश बोबडे,स्वराली बोबडे,सोमनाथ ताबे,सचिन होदाडे,तुकाराम डोके,सोमनाथ महाडिक,गणेश पाटील,बंकट देशमुख अमोल धोत्रे सर, रामभाऊ पवार,समिर नाईकनवरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
*यावेळी कृष्णात (दादा) बोबडे चषकाचे आयोजन केले होते.या क्रिकेट स्पर्धेतील प्रथम विजेत्या भिमानगर संघास एक लाख,११ हजार ३३३ रु,द्वितीय ६१ हजार ३३३ रु,तृतीय ३१ हजार ३३३ रु,चतुर्थ २१ हजार ३३३ रु.रोख स्वरूपात बक्षीस,ट्रॉफी देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा