Breaking

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

पिलीव येथील विमा प्रतिनिधी दत्तुसिंग भैस यांना पंधराव्यांदा एमडीआरटी पुरस्कार प्रदान



पिलीव येथील विमा प्रतिनिधी दत्तुसिंग भैस यांना  पंधराव्यांदा एमडीआरटी पुरस्कार प्रदान     


    पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस -  माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विमा प्रतिनिधी  दत्तुसिंग बाळुसिंग भैस यांना एल आयसीमध्ये उत्तुंग कार्य केल्याबद्दल  सलग पंधराव्यांदा अमेरीकेचा मानाचा एमडीआरटी हा पुरस्कार मिळाला आहे. पिलीव सारख्या ग्रामीण भागात ते १९९९ पासुन विमा प्रतिनिधी म्हणून जवळपास  २५ वर्ष झाले काम करीत आहेत. त्यांनी सलग पाच वर्ष दरवर्षी एक लाख रुपयाचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे बक्षीस म्हणून विमा ग्रामनिधी पिलीव गावाला पंढरपूर शाखेकडून मिळवुन दिला आहे. सदरचा पुरस्कार  त्यांना  ब्रँच मॅनेजर अनोकर ,पंढरपूर विभागाचे विमा विकास अधिकारी शशिकांत निकम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना एमडीआरटी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे  बखरनामाचे संपादक उमेश घोंगडे, राहुल खलीपे, गोविंद भैस, विठ्ठल भिसन,हनुमंत पिसे,समर्थ जामदार, नितीन गबाले,  कुमार भैस, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडुन त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.      

     फोटो - एमडीआरटी पुरस्कार  ब्रँच मॅनेजर अनोकर यांच्या हस्ते स्विकारताना शेजारी  विमा विकास अधिकारी  शशिकांत निकम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा