पै.राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १०५ जणांचे रक्तदान
टेंभुर्णी प्रतिनिधी :- युवा नेते पै. राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह येथे टेंभुर्णीच्या महिला सरपंच सुरजा बोबडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरूण कार्यकर्त्यांची उस्फूर्त गर्दी रक्तदान करण्यासाठी दिसून आली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून अशा तरूण कार्यकर्त्यांनी आपले वाढदिवस साजरे केले तर गरजू लोकांना रक्त पुरवठा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याचा आदर्श सर्व समाज बांधवांनी घेऊन "रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान"समजून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असा संदेश यावेळी गेला.
आपण सर्वांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मदत करून आणि माणुसकीचे दर्शन घडवले. या रक्तदान शिबिरात १०५ इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी कुर्डूवाडी ब्लड सेंटर, कुर्डूवाडी या रक्तपेढीने सहकार्य केले. याप्रसंगी टेंभुर्णी ग्रामपंचायत सरपंच सौ सुरजा बोबडे,
सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अमरसिंह शेंडे, उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे, माजी सरपंच प्रमोद कुटे. भाजपचे आर पीआय चे जयवंत पोळ, अनुसूचित जाती मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष यशपाल लोंढे, ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे, गौतम कांबळे, सोमनाथ तांबे, तुकाराम डोके, वैभव महाडिक, बाळासाहेब ढेकणे, ॲड.आकाश लोंढे,दिलीप पवार, कृष्णा धोत्रे, शिवाजी गोंदील, रवि कुणाळे सर, विकास धोत्रे, विजय कोकाटे,सनी पवार, अविनाश धोत्रे आदी जण उपस्थित होते . हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दीपक पवार , लखन पवार , सचिन पवार ,दादा माने, कालिदास पवार , जॉकी सुर्वे , प्रतीक माने, नितीन चव्हाण, सोमनाथ शिंदे, आकाश जगताप , सुरज जाधव , शुभम कांबळे , अजय पवार, टिंकू कीर्ते, योगेश पवार , राजू वाघ,विशाल पवार, सुरज पवार , शंकर चंदनशिवे , सज्जन पवार, शंकर मोरे, विशाल धोत्रे ,हनुमंत पवार, संतोष शिंदे यांच्यासह पै. राम पवार मित्रपरिवार व जय बजरंग ग्रुप टेंभुर्णी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा