माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड
करमाळा, प्रतिनिधी - माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी शहरातील विशाल सुरेशसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मंगळवार दि. ०७/०१/२०२५ रोजी विशाल परदेशी यांना निवडीचे पत्र दिले आहे.
भारतीय संविधान, भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच या पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करणार आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करणार असल्याचे विशाल परदेशी यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले आहे.
या निवडीनंतर विशाल परदेशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा