*टेंभुर्णी प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी अमरसिंह शेंडे यांची निवड उपध्यक्षपदी धनंजय मोरे*
*सचिव पदी सतिश काळे खजिनदार पदी सचिन होदाडे यांची निवड*
टेंभुर्णी प्रतिनिधी:-टेंभुर्णी प्रेस क्लब च्या सर्व सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिं २ जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० वाजता टेंभुर्णी प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष गणेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी येथील हॉटेल जगदंबा डायनिंग हॉल येथे पार पडली.
यावेळी सन २०२५ या सालाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये दैनिक लोक सह्याद्रीचे संपादक अमरसिंह शेंडे यांची अध्यक्षपदी एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली हि निवड झाल्या बद्दल मावळते अध्यक्ष गणेश चौगुले यांनी अमरसिंह शेंडे यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करुन अभिनंदन केले तर या प्रसंगी पत्रकार धनंजय मोरे यांची उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आल्या बद्दल पत्रकार सदाशिव पवार यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर पत्रकार सतीश काळे यांची सचिव पदासाठी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार पत्रकार संतोष पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच खजिनदार पदी पत्रकार सचिन होदाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार पत्रकार सतीश चांदगुडे पत्रकार सोपान ढगे यांनी केला.
या निवडी वेळी सुरज देशमुख यांनी प्रस्ताविक केले तर टेंभुर्णी प्रेस क्लब बाबत संतोष पाटील, सुहास साळुंखे, सोपान ढगे, सदाशिव पवार यांनी मार्गदर्शन केले. या निवडीच्या वेळी सदाशिव पवार,गणेश चौगुले, सोपान ढगे, संतोष पाटील,अनिल जगताप, सतीश चांदगुडे,विष्णूभाऊ बिचकुले, सुहास साळुंखे,आदी पत्रकार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा