रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी वर्षा खटके - पाटील
टेंभूर्णी
(प्रतिनिधी):- रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन दापोली या संघटनेत वर्षा संजय खटके पाटील यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन दापोली ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी राष्ट्रीय संस्था आहे.या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर आहे.
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढविणे व शिक्षण क्षेत्राचा शासनाशी समन्वय साधने या हेतूने ही संस्था कार्यरत आहे.तसेच शिक्षण, पर्यटन, पर्यावरण, विकास, क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.
या संघटनेचे अध्यक्ष मा प्रा. संजय काशिद सर तसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी आजपर्यंतच्या वर्षा खटके पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. असून सौ वर्षा खटके ह्या मूळ सोलापूर जिल्ह्यातील सापडणे (टें ) तालुका माढा, गावच्या कन्या असून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ढवळे यांची पुतणी आहे त्या मुळे माजी संचालक बाळासाहेब ढवळे, माजी उपसभापती तुकाराम बंडू नाना ढवळे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सापडणे टें चे माजी उपसरपंच दत्तात्रय ढवळे, कृषी अधिकारी संजय पाटील, मोडनिंब येथील कृषी अधिकारी आनंद ढवळे, तसेच माजी सभापती यशोदा ढवळे-गोंदिल , यशोदीप कॅम्पुटर चे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके सर, नानासाहेब ढवळे, इतर मान्यवरांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा