आजाद युवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्याचे काम करावे ....पो.नि. दिपक पाटील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरबत वाटप
टेंभुर्णी प्रतिनिधी - टेंभुर्णी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते याचेच औचित्य साधून सालाबाद प्रमाणे आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने सरबत वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभुर्णी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सरबत वाटप कार्यक्रमाची सुरुवात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
या वेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी आझाद युवा फाउंडेशन बद्दल बोलताना सांगितले की मी दोन वर्षांपासून पाहत आलो आहे आझाद युवा फाउंडेशन कायमच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात असेच कायम सामाजिक सलोख्याचे कार्य करत रहा आज टेंभुर्णी शहरातील व परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व समाजातील कार्यकर्त्यांना आपण सरबत वाटप करून मनाला शांत व थंड वाटत आहे असेच काम आजादीवा फाउंडेशनने पुढेही चालवावे व सर्व समाजाचा सामाजिक सलोखा राखण्याचे काम करावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा