श्रीमती शामलताई बागल सहकारी पतसंस्थेचा व आमच्या कुटुंबाचा कोणताही आर्थिक संबंध नाही,,,,,,,,, युवा नेते दिग्विजय बागल यांचा मोठा खुलासा
करमाळा (प्रतिनिधी)
श्रीदेवीचा माळ तालुका करमाळा येथील श्रीमती शामल बागल सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीदेवीचा माळ या पतसंस्थेचा स्वतः माजी आमदार आदरणीय श्रीमती शामलताई बागल यांचा अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा वैयक्तिकरित्या संबंध नाही या पतसंस्थेचे नाव तेथील नागरिकांनी श्रद्धेने ठेवले असून या पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहार अथवा ठेवीदारांचे ठेवी तसेच पतसंस्थेचे एकूण आर्थिक व इतर कामकाज यांचा माझा स्वतःचा त्याचबरोबर माझ्या मातोश्री आदरणीय माजी आमदार श्रीमती शामलताई बागल यांचा वा माझ्या भगिनी आमच्या नेत्या रश्मीदिदी बागल यांचा कोणताही संबंध नाही पतसंस्था ही ठेवीदारांच्या व ग्राहकांच्या विश्वासावर चालत असते त्यांचे काम व पतसंस्था हा स्वतंत्र भाग आहे त्यामध्ये माझ्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीचा कसलाही आर्थिक अथवा इतर हितसंबंध नाही शामल बागल सहकारी पतसंस्था हे नाव स्थानिक लोकांनी त्यांच्या श्रद्धेपोटी श्रद्धेने ठेवलेले आहे याबाबत सध्या विविध वावड्या व अफवा उठत असून याबाबत आम्ही कोणत्याही गैर व्यवहाराला पाठीशी घातले नाही अथवा प्रोत्साहन दिलेले नाही सदर पतसंस्थेबाबत जो निर्णय सहकारी कायद्यानुसार होईल तो कायदा त्याचे काम करेल या पतसंस्थेशी आमचा कोणताही संबंध नसल्याचा निर्वाळा दिग्विजय बागल यांनी आज करमाळा येथे दिला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा