करमाळा तालुक्यातील सुपुत्र एव्हरेस्ट वीर
शिवाजी ननवरे यांनी जगातील चौथ्या उंचीचे लोहतसे शिखर केले पार
करमाळा प्रतिनिधी
कोंढेज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील सुपुत्र एव्हरेस्ट वीर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नागपूर शहर गुन्हे शाखा शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी जगातील चौथ्या उंचीचे ल्होत्से शिखर आज सर केले.तसेच या अगोदर जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर(8848 मीटर) त्यानंतर मकालू शिखर (8484 मीटर)त्यानंतर मनासलू शिखर (8163 मीटर)व आता जगातील चौथ्या क्रमांकाचे लोहत्से शिखर(8516 मीटर) त्यांनी सर केले. अत्यंत खराब वातावरण असताना सुद्धा दिनांक 23/05/2025 रोजी चाळीस दिवस नेपाळ येथे तळ ठोकून जिद्द व चिकाटीच्या जोरावर नियमित खडतर सराव करून आपले कर्तव्य बजावून शिखर यशस्वीरित्या सर केलेले आहे त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की माझे शिखर सर केलेले यश हे ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेले जवान व पहलगामा हल्ल्यात मृत्यू पडले नागरिक यांना समर्पित करतो असे त्यांनी सांगितलेले आहे.तसेच ते आठ हजार मीटर उंचीपेक्षा जास्त उंचीची चार शिखरे सर करणारे देशातील तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव आणि पहिले पोलीस अधिकारी आहेत.
यासाठी सोलापूर जिल्ह्याला आणि पोलीस खात्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे.त्यांच्या यशाबद्दल कोंढज गावातील ग्रामस्थ तसेच त्यांचे पुणे पोलीस दलातील सहकारी मित्र यांनी अभिनंदन केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा