माढा तालुक्यात प्रशासकीय अधिकार्यांची त्वरित नेमणूक करावी - संजय पाटील भिमानगरकर.
टेंभुर्णी /प्रतिनिधी
माढा तालुक्यात तहसीलदर , प्रांत अधिकारी व गटविकास अधिकारी नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. १७ फेब्रुवारीपासून तालुक्याचे तहसीलदार नसल्यामुळे तसेच प्रांताधिकारी बदलून गेलेमुळे इतर तालुक्यातील तहसीलदारकडे व प्रांतअधिकारी यांच्याकडे चार्ज असल्याने सर्वसामान्य लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माढा तालुक्यात प्रशासकीय अधिकारी यांची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , माढा तालुक्यात प्रशासकीय अधिकारी असलेले तहसीलदार , प्रांताधिकारी , गटविकास अधिकारी हे आठवड्यातून १ ते २ दिवस येतात . तसेच गटविकास अधिकारी कुर्डुवाडी यांच्याकडे हि बार्शी तालुक्याचा जादा चार्ज असल्यामुळे ते पण आठवड्यातून २ ते ३ दिवस असतात. त्यामुळे माढा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी रेगुलर नसल्यामुळे तालुकयातील सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत. तरी तालुक्याला तहसीलदार, प्रांत अधिकारी व गटविकास अधिकारी तालुक्यासाठी रेगुलर मिळाले तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले आहे.
तिन्ही अधिकाऱ्यांची एक महिन्याच्या आत नेमणूक नाही झाल्यास आंदोलन करणार असल्याचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा