Breaking

शुक्रवार, २३ मे, २०२५

टेंभुर्णी परिसरातील विद्यार्थ्यांनी साक्षी पलंगेचा आदर्श घ्यावा वैभव कुटे*


*टेंभुर्णी परिसरातील विद्यार्थ्यांनी साक्षी पलंगेचा आदर्श घ्यावा वैभव कुटे*
 टेंभुर्णी प्रतिनिधी :- टेंभुर्णी परिसरातील विद्यार्थ्यांनी साक्षी पलंगे चा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन टेंभुर्णी पंचायत समितीचे मा.सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे यांनी साक्षी  मुंबई येथे पोलीस मध्ये ड्युटी जॉईंट करण्यासाठी जात असताना तिचा सत्कार करते वेळी ते बोलत होते. 
माढा तालुक्यात अद्यापही शैक्षणिक सुविधा कमी असताना माढा तालुक्यातील अनेक विद्यार्थी अभ्यास करून वेगवेगळ्या मोठ्या पदावरती गेले आहेत अशाच पद्धतीने साक्षीने अभ्यास करून तिने टेंभुर्णी कराची मान उंचावली आहे तिचे वडील गणेश पलंगे हे कष्टाळू असून गरीब कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा त्यांनी मुलाप्रमाणे मुलींना शिकवण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आहे त्यामुळे आज साक्षीने टेंभुर्णी चेहरा बरोबर आई-वडिलांची मान उंचावली आहे.
साक्षी पलंगे हिने मुंबई पोलीसमध्ये आपले स्थान निश्चित केल्याबद्दल मा. पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या वेळी टेंभुर्णी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गाडेकर, पत्रकार संतोष वाघमारे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप, गणेश पोळ, सतीश चांदगुडे, सुरेश पलंगे, गणेश पलंगे , इत्यादींनी उपस्थित राहून तिला शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा